बीड : धक्कादायक...टॅब न मिळाल्याने युवकाने संपविले आयुष्य..!

वैजिनाथ जाधव
Friday, 19 June 2020

दहावीची परीक्षा दिलेल्या युवकाने पुढील ऑनलाईन अभ्यासासाठी पालकांना टॅब मागीतला. काही दिवस थांब असे घरच्यांनी सांगीतले. यानंतर त्याने आत्महत्या केली.

गेवराई (बीड) : तालुक्यात गुरुवार-शुक्रवार या दोन दिवसांत दोन युवकांनी आत्महत्या केली. यातील एकाची आत्महत्या ही ऑनलाईन शिक्षणासाठी टॅबच्या मागणीवरुन झाली आहे. यावरुन ऑनलाईन शिक्षण गरिबांसाठी जिवावर उठत असल्याचे समोर आले आहे.

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

तालूक्यातील भोजगाव येथील अभिषेक राजेंद्र संत याने दहावीची परीक्षा दिली आहे. अद्याप निकाल लागलेला नाही. मात्र, पुढचे शिक्षण आता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने त्याला टॅब मोबाईल हवा होता. त्याने पालकांना टॅबची मागणी केली. मात्र, थोडे दिवस थांब, सध्या पेरणीचे दिवस असल्याने बि - बियाणे खरेदी आवश्यक आहे. नंतर घेऊ, असे त्याला घरच्यांनी सांगीतले.

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

मात्र, घरचे सर्वजण शेतात गेल्यानंतर त्याने गुरुवारी घरातील माळवदाच्या कडीला गळफास लाऊन आत्महत्या केली. सदरील घटनेची माहिती गेवराई पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम चौबे, फौजदार युवराज टाकसाळ,  सहाय्यक फौजदार श्री. फड, श्री. बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्याच्या पश्चात आई, वडिल, एक भाऊ, आजी व आजोबा असा परीवार आहे.

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

केकतपांगरी येथील युवकाची आत्महत्या
 
दुसरी घटना मध्यरात्री तालुक्यातील केकतपांगरी येथे घडली. तमन्ना आग्नेश भोसले (वय २०) या तरुणाने घरातील सर्वजण झोपेत असताना घरातील पत्र्याच्या अडुला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब घरच्यांना माहित होताच घरात एकच गोंधळ उडाल्याने गावातील नागरिक घटनास्थळी धावून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस जमादार उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. ही आत्महात्या कशामुळे केली याचे कारण अद्याप समजलेले नाही. याचा तपास पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gevrai Youth suicide for tab