Yermala : श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेची घुगरी महाप्रसादाने सांगता

दीपक बारकुल (बातमीदार) येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेची सांगता आज रवीवारी घुगरी महाप्रसादाच्या वाटपाने झाली.गेले पाच दिवस श्री येडेश्वरी देवीचीची पालखी चैत्रपौर्णिमा यात्रेनिमित्त आमराई पालखी मंदिरात मुक्कामी होती.
Yermala
Yermala sakal

येरमाळा : दीपक बारकुल (बातमीदार) येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेची सांगता आज रवीवारी घुगरी महाप्रसादाच्या वाटपाने झाली.गेले पाच दिवस श्री येडेश्वरी देवीचीची पालखी चैत्रपौर्णिमा यात्रेनिमित्त आमराई पालखी मंदिरात मुक्कामी होती.पाचव्या दिवशी घुगरीच्या महाप्रसाद वाटपाचे आयोजन असते यानंतर देवीच्या पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान झाले.

सलग पाच दिवस चालू असलेल्या या यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.चुनाववेचण्याच्या कार्यक्रमासाठी चुन्याच्या रानात पालखी आल्यानंतर पंधरा लाखांहून अधिक संख्येने उपस्थित राहून भाविकांनी पालखी वर चुनखडी टाकली तेथून पालखी आमराई मंदिरात आल्यानंतर पालखीचा मुक्काम पाच दिवस असतो.या काळात भाविक मोठ्या संख्येने पालखीच्या दर्शनासाठी गर्दी होती.

आज यात्रेचा शेवट दिवस असल्याने भाविकांनी पालखी दर्शनासह घुगरी प्रसादासाठी गर्दी केली होती.शिवाय मनोरंजनासाठी आलेल्या व्यवसियाकांच्या स्टॉलमधील आवश्यक वस्तुं,गृहउपयोगी सामानाची खरेदी करण्यात महिला भाविक गुंतल्याचे चित्र दिसत होते.यात्रा म्हणलं की,अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते यामध्ये शुक्रवारी रात्री पांचक्रोशीतीच्या गावातील देवीच्या आराधी मंडळासाठी आराधी गाण्यांच्या स्पर्धा व शनिवारी रात्री शोभेच्या दारुची आतिषबाजी करून भाविकांचे व यात्रेत सहभागी झालेल्या लोकांचे मनोरंजन करण्यात आले.

Yermala
Sambhaji Nagar News : शालेय स्तरावरच आता शेतीचे धडे ; कार्यानुभव विषयांतर्गत कृषी घटकांचे दिले जाणार ज्ञान

आज शेवटच्या दिवशी गावातील घरोघरी जाऊनरब्बी हंगामातील नवीन ज्वारी,गहू,हरभरा जमा केलेल्या धान्यातून घुगरी महाप्रसाद तयार करुन घुगरीचे वाटप केले जाते.यामध्ये भाविक आपल्या भावनेनुसार घुगरी मध्ये मनुके, बदाम,काजू,गूळ साखर ही टाकतात. चार वाजता आमराई मंदिरात देवीच्या पालखीची आरती महापूजा करुन घुगरी प्रसादाचे पुजारी,मानकरी,ग्राम पंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते घूगरी प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता करण्यात आली.या घुगरी प्रसादासाठी अनेक जिल्ह्यातून भाविक आले होते.

आज पालखीचे प्रस्थान मुख्य डोंगरावरील मंदिराकडे होत असताना गावातील मुख्यचौकाचौकातून जाते. पालखीच्या पाठवणीसाठी गावातील प्रत्येक घरासमोर महिलांनी सडा शिंपून रांगोळी काढली होत्या फुलं अंथरुन,पालखीला पायघड्या घालण्यात आल्या होत्या पालखीघरासमोर आल्यानंतर पालखीच्या खांदेकरी,यांच्या पायावर पाणी वाहून चुरमुरे,लाह्या,बतासे,रेवढ्याचा प्रसाद वाहून प्रसाद वाटला.

गेले पाच दिवस यात्रेच्या उत्साहाचे होते. पालखीची पाठवणी म्हणजे नववधूच्या लग्नानंतरची पाठवणी असे कांही वातावरण पालखी पाठवणीचे असते.पालखी जाताना चित्र पाहुन कांही महिला भाविकांचे डोळे पाणावलेले दिसले त्यामुळे साश्रुनयनांनी देवीच्या पालखीस भाविकांनी जडअंतःकरणाने निरोप दिला गावातून पालखी गावकुसाबाहेरील ढाशीवर आल्या नंतर ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेत सहकार्य करणाऱ्या सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांचे आभार म्हणून शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून सन्मान करण्यात आहे.याशिवाय टँकर,पाणपोई,पाणी बाटली वाटप करणाऱ्या भक्तांचेही सन्मान करण्यात आले.यानंतर देवीची पालखी डोंगरवरील मुख्य मंदिराकडे रवाना झाली.

चौकट...देवीची पालखी आलेल्या दिवशी लाखो भाविकांनी वेचलेली चूनखडी शुक्रवारी रात्री चुन्याच्या रानातील राशीवर गोवऱ्याच्या भट्टीत भाजन्यात आली.याभाजलेल्या चुन्याच्या राशीतील चुना वेचून पंचक्रोशीत भाविक चूनाच्या राशीवर जमा करतात.आज पालखी सोबत ही भाजलेली चुनखडीची मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करुन बैलगाडीनेमंदिराकडे नेहून रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी मंदिराला पहाटे चुन्याने रंगावण्याची प्रथा आहे. पहाटेच भाविक मंदिरात चुन्याने मंदिर सारववात.ही प्रथापूर्वापार चालत आली असून यासाठी आज आलेले भाविक मुकामी मंदिरावर राहतात तर कांहीं भाविक पहाटे मंदिराला सारवण्यासाठी येतात.त्यामुळेच चुना वेचण्याची परंपरा रूढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com