सात लाख चोरून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद - लग्नाचे आमिष दाखवून सोळा वर्षीय मुलीच्या घरातून सुमारे सात लाख रुपये चोरले. शिवाय तिला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार, हामीद खान हनिफ खान (19, रा. बायजीपुरा) याला पोलिसांनी शनिवारी (ता. 16) अटक केली. त्याला मंगळवारपर्यंत (ता. 19) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दिले. 

औरंगाबाद - लग्नाचे आमिष दाखवून सोळा वर्षीय मुलीच्या घरातून सुमारे सात लाख रुपये चोरले. शिवाय तिला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार, हामीद खान हनिफ खान (19, रा. बायजीपुरा) याला पोलिसांनी शनिवारी (ता. 16) अटक केली. त्याला मंगळवारपर्यंत (ता. 19) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दिले. 

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेच्या आई-वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून पीडिता आजीसोबत राहते. सहा महिन्यांपूर्वी पीडितेची ओळख हामीदशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दीड महिन्यापूर्वी पीडितेच्या आजीने तिचे घर सात लाख रुपयांना विकले होते. ते पैसे आजीने घरी आणून ठेवलेले. दरम्यान, दिवाळीपूर्वी पीडितेची आजी बाहेगावी नातेवाइकांच्या घरी गेली होती.

ही संधी साधत हामीद पीडितेच्या घरी आला. त्यांच्यामध्ये लग्नाविषयी चर्चा झाली. काही वेळाने त्याने धान्याच्या रूमला कुलूप का लावले, अशी विचारणा पीडितेकडे केली. त्यावर पीडितेने त्यात पैसे असल्याचे त्याला सांगितले. संशयिताने पीडितेला आपण पैसे घेऊन जाऊ व लग्न करू, अशी बतावणी केली. त्यावर पीडिता तयार झाली. संशयिताने धान्याच्या कोठीचे कुलूप तोडून पाच लाख 80 हजार व तर कपाटातून एक लाख 20 हजार रुपये काढून घेत सायंकाळी पीडितेला घेऊन तो मुंबईला गेला.

उघडून तर बघा : Video : अंधारून येताच सरोवरावरून उडतात राक्षसी जीव 

तेथे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सात दिवस राहत त्याने पिडितेवर बळजबरीने अत्याचार केला. दरम्यान, पीडितेने लग्नाविषयी विचारले असता त्याने उडवा-उडीवीची उत्तरे दिली. पीडितेने आपबिती आजीला सांगितली. या प्रकरणी छावणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. 

हेही वाचा : तुम्ही दहावी पास आहात का ? तुम्हाला या क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी 
 
चिकलठाण्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार 
दुसऱ्या घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको एन-चार परिसरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस एका युवकाने 14 ते 15 नोव्हेंबर या काळात लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आकाश प्रकाश ठोकळ (वय 19, रा.चिकलठाणा) याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl raped in Aurangabad crime