Sakal_Impact : घाटीतील बेहाल रुग्णांच्या समस्या गाजणार हिवाळी अधिवेशनात

योगेश पायघन
रविवार, 15 डिसेंबर 2019

सहा विधानपरिषद सदस्यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना केल्याने घाटीच्या समस्या ऐरणीवर येणार आहेत. आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, हेमंत टकले, अंबादास दानवे, डॉ. मनिषा कायंदे, विलास पोतणीस यांनी नियम 101 नुसार लक्षवेधी सुचना विधानसभेत मांडली आहे. 

औरंगाबाद : कायम दुर्लक्षित मराठवाड्याचे विभागीय टर्शरी केअर सेंटर असलेल्या घाटी रुग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. घाटीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष, मनुष्यबळाची कमतरता, नादुरुस्त यंत्रसामुग्री आणि प्रलंबित पुरवणी मागण्यांवर वेळेवर निर्णय न झाल्याने रुग्णसेवा प्रभावित झाल्याचे "सकाळ'ने सातत्याने समोर आणले. त्याची दखल घेत सहा विधानपरिषद सदस्यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना केल्याने घाटीच्या समस्या ऐरणीवर येणार आहेत.

आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, हेमंत टकले, अंबादास दानवे, डॉ. मनिषा कायंदे, विलास पोतणीस यांनी नियम 101 नुसार लक्षवेधी सुचना विधानसभेत मांडली आहे. यात "सकाळ'ने मांडलेल्या बहुतांश समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. घाटीचा सहा दशकांचा प्रवास आहे. 1177 खाटांच्या या रुग्णालयात तीन हजारावर रुग्ण दररोज उपचारासाठी नोंदणी करतात.

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

त्यांना औषधी उपलब्ध नसणे, निधीअभावी औषधी, सर्जीकल साहीत्याचा पुरवठादांकडून पुरवठा बंद होणे, त्यामुळे औषधी उपलब्ध न झाल्याने रुग्णांना बाहेरून औषधी आणाव्या लागल्याने आर्थीक भुर्दंड पडणे, हाफकिनकडून रखडलेली खरेदी, वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करुनही कोणताही प्रतिसाद न मिळणे, रिक्त पदे न भरणे, यंत्रसामग्री दुरुस्तीसाठी निधी नसल्याने ट्रॉमाचे व्हेंटीलेटर बंद, हिवाळी अधिवेशनात 17.30 कोटींची मागणी असताना ती दुर्लक्षित होणे.

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

सुपरस्पेशालीटी इमारत सुरु करण्यासाठी होत असलेली दिरंगाई आदी विषयांवर या सूचनेत राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहेत. यासंबंधी शासनाने केलेली कार्यवाही व करावयाची कारवाईची विधान परिषदेच्या अधिवेशनात कळणार आहे. या समस्या सुटल्यास घाटीत खान्देश विदर्भासह मराठवाड्यातून येणाऱ्या रुग्णांचे उपचार सुरळीत होण्यास मदत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gmch Aurangabad Patients' Problems Will Be Addressed During The Winter Session