विवाहिता गोट्यासोबत भुर्र, दागिने अन् रोकडही नेली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

विवाहितेने विवाहबाह्य संबंध ठेवलेल्या प्रियकरासोबत पाच तोळ्यांचे दागिने आणि साठ हजारांची रोख लांबविले. हा प्रकार 13 नोव्हेंबर रोजी दुपारी चार ते सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

औरंगाबाद - तो तिच्या पतीच्या ओळखीचा. पतीसोबत अधून-मधून घरीही यायचा. अशात त्याचे अन् तिचे सूत जुळले. एक दिवस तिने घरातील पाच तोळ्यांचे दागिने अन् 60 हजारांची रोकड घेऊन घरातून पळ काढला. हतबल पत्नीने अखेर पोलिस ठाणे गाठत तिच्यासह तिच्या प्रियकराविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी शहरातील मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. अनमोल ऊर्फ गोट्या अनिल सवई असे प्रियकराचे नाव आहे.

पतीने तक्रारीनुसार, विवाहितेने विवाहबाह्य संबंध ठेवलेल्या प्रियकरासोबत पाच तोळ्यांचे दागिने आणि साठ हजारांची रोख लांबविले. हा प्रकार 13 नोव्हेंबर रोजी दुपारी चार ते सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अनमोल ऊर्फ गोट्या अनिल सवई व विवाहितेवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात 12 डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डेनगरातील एका कामगाराच्या पत्नीचे गोट्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा प्रकार विवाहितेच्या पतीला माहिती झाला.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

गोट्या नेहमी त्या कामगाराच्या घरी ये-जा करायचा. 13 नोव्हेंबरला दुपारी चारच्या सुमारास गोट्या कामगाराच्या घरी गेला. यावेळी गोट्याने विवाहितेसोबत फरार होण्यासाठी घरातून पाच तोळ्याचे दागिने व साठ हजारांची रक्कम घेतली. या दोघांनी संगनमत करून दागिने व रोख लांबविल्याचे पतीने तक्रारीत म्हटले आहे. पोलिस विवाहिता आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

व्यापाऱ्यांचे फसवणूक प्रकरण  आता आर्थिक गुन्हे शाखेकडे 
औरंगाबाद -
35 धान्य व्यापाऱ्यांना गंडवल्याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता; मात्र पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुरुवारी (ता.12) हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितल्यानुसार, जाधववाडी मोंढ्यातील धान्य व्यापारी पंकज धन्नालाल चुडीवाल (43, रा. मेडॉज अप टाऊन, शहानूरवाडी) यांनी तक्रार दिली असून, इचलकरंजी येथील ट्रेडको इंडिया कंपनी प्रा. लि.चा मालक राजरतन बाबूलाल अग्रवाल आणि संचालिका निधी राजरतन अग्रवाल हे संशयित आहेत. या प्रकरणात 34 व्यापाऱ्यांची यात फसवणूक झाली असून, 12 जून ते 26 ऑगस्ट 2018 हे प्रकरण घडले आहे. 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

बसचालकाला मारहाण, दोघे अटकेत 
औरंगाबाद -
 दुचाकीला हुलकावणी का दिली म्हणत दोघांनी बसचालकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता. 11) दुपारी तीनच्या सुमारास रेल्वेस्टेशन पार्किंगमध्ये घडली.  दिलीप निवृत्ती नागरगोजे (वय 35, मूळ रा. जवळवाडी, जि. अहमदनगर) हे बस उभी करून रेल्वेस्टेशनच्या पार्किंगमध्ये उभे असताना त्यांना दुचाकीला हुलकावणी दिल्याच्या कारणावरून सय्यद अखिल सय्यद काजील (29, रा. सिल्कमिल कॉलनी) व शेख अकील शेख सलील (26, रा. जहागीरदार कॉलनी) यांनी मारहाण केली. त्यावरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Theft in Husband's House Aurangabad