गुड न्यूज ः परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणु येतोय आटोक्यात

गणेश पांडे
Sunday, 18 October 2020

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या संसर्गाचा प्रसार झपाट्याने झाला होता. मे महिणा सोडला तर जुन महिण्यापासून जिल्हयात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेली.

परभणी ः जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्येत आता लक्षणीय घट झाली आहे. जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या 1 हजार 744 खांटापैकी तब्बल 1 हजार 420 खाटा आता रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे आता कोरोना बाधित रुग्णांची जिल्ह्यातील संख्या आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. ही आनंदाची बातमी जरी ठरत असली तरी कोरोना संसर्गाच्या प्रसाराचा धोका अद्यापही टळला नसल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या संसर्गाचा प्रसार झपाट्याने झाला होता. मे महिणा सोडला तर जुन महिण्यापासून जिल्हयात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेली. ऑक्टोबर महिण्याच्या मध्याकडे सरकरत असतांना जिल्ह्यात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल 6  हजार 231 वर गेली आहे. त्यामुळे जिल्हया प्रशासनासह आरोग्य यंत्रणा कमालीची दबावाखाली आली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना काही कडक उपाय योजना कराव्या लागल्या. त्यात संचारबंदीसह इतर उपाययोजनाचा समावेश होता. त्यामुळे जुन महिण्याच्या मध्यापासून आढळणाऱ्या रुग्ण संख्येत ऑक्टोबर महिण्याच्या सरतेशेवटी लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - राज्याच्या इतिहासात आजवर घडले नाही असे राज्यपालांचे वर्तन- विजय वडेट्टीवार -

टाळेबंदीतून शिथिलता हे मुख्य कारण समोर आले

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात सर्वाधिक टाळेबंदीची अमलबजावणी करण्यात आल्याने सुरुवातीच्या चार महिण्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी राहिला होता. परंतू  जून महिण्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून रुग्ण संख्येचे प्रमाण वाढत गेले. याला टाळेबंदीतून शिथिलता हे मुख्य कारण समोर आले आहे. त्याच बरोबर परजिल्ह्यातुन परभणी जिल्ह्यात येणाऱ्या नागरीकांची वाढती संख्या देखील कारणीभुत ठरली आहे. हळूहळू एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 185 पर्यंत पोहचली.

रॅपीड टेस्टमुळे ही वाढली संख्या

 शहरातील 17 केंद्रावर रॅपिड अॅन्टीजन टेस्टला सुरुवात केली. व्यापाऱ्यांना ता. 17 ऑगस्टपर्यंत  स्वतासह कुटूंबाची तपासणी करणे जिल्हा प्रशानाच्यावतीने सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात व्यापाऱ्यांनी टेस्टही करून घेतल्या. परंतू हळू हळू याचे प्रमाणही कमी झाले. सध्या शहरात केवळ आठ तपासणी केंद्र कार्यान्वीत आहेत

येथे क्लिक करा नासाडी टाळण्यासाठी शाळांमध्ये खिचडीऐवजी शिधा द्यावा -

मास्क न वापरणे व सोशल डिस्टसिंगचा फज्जा

शहरात रुग्ण संख्या जरी कमी झाली असली तरी कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार होण्याचा धोका अद्यापही टळलेला नाही. असे असतांनाही शहरातील अनेक नागरीक सार्वजनिक ठिकाणी किंवा बाजारात फिरतांना तोंडावर मास्क वापरत नसल्याचे प्रकर्षाणे दिसून येते. महापालिका प्रशासनाने सुरुवातीच्या काळात अश्या नागरीकांना आर्थिक दंड लावण्याची मोहिम सुरु केली होती. परंतू आता ती मोहिम ही थंडावली असल्याचे दिसते. सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे ही दिसत आहे.

कोरोनाची जिल्ह्यातील स्थिती

बरे होण्याचे प्रमाण ः 84.72 टक्के

एकूण दवाखाने ः 34

एकूण खाटांची संख्या 1744

रिक्त खाटांची संख्या 1420

अॅक्टीव खाटा ः 324

ऑक्सीजन सिलिंडरची स्थिती ः 1000 जम्बो सिलिंडर

व्हेन्टीलेटरची स्थिती ः 125

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news: Corona virus is coming under control in Parbhani district