esakal | भाविकांसाठी खुशखबर ! कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन घ्या ऑनलाईन
sakal

बोलून बातमी शोधा

TuljaBhavani.jpg

ऑनलाईन दर्शनासाठी  https://shrituljabhavani.org/LiveShriTuljabhavani.html ही लिंक दिलेली असुन भक्तांना तिथे देवीचे दर्शन घेण्याची सोय निर्माण करुन देण्यात आली आहे.

भाविकांसाठी खुशखबर ! कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन घ्या ऑनलाईन

sakal_logo
By
तानाजी जाधवर

तुळजापूर (उस्मानाबाद) : कोरोना विषाणुचा प्रसार होवू नये यासाठी यंदाचा नवरात्रोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. साहजिकच त्यामुळे भक्ताची मोठी अडचण झाली आहे. त्यासाठी देवस्थान समितीच्यावतीने देवीच्या ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली असुन त्याची लिंक देखील शेअर करण्यात येत आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

ऑनलाईन दर्शनासाठी  https://shrituljabhavani.org/LiveShriTuljabhavani.html ही लिंक दिलेली असुन भक्तांना तिथे देवीचे दर्शन घेण्याची सोय निर्माण करुन देण्यात आली आहे.

मंदीर संस्थानकडून रॅपिड अँटीजन टेस्टचा तपासणीचा अवलंब केला जाणार आहे. दैनंदिन निर्जंतुकीकरण, सामाजिक अंतराचे पालन, तोंडाला मास्क लावणे व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कालावधीत मंदिरात व मंदिर परिसरात मद्यपान, पान, तंबाखू, गुटखा इत्यादी तत्सम पदार्थाचे सेवन करता येणार नसल्याचेही मंदीर समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन दिलेल्या आदेशानुसार जिल्हयातील धार्मिक ठिकाणे व प्रार्थनास्थळे शासनाने पुढील आदेशापर्यंत जनतेसाठी बंद केली आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मेळावे व समारंभ यांच्यावरील निर्बंध कायम राहणार आहे, गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यास मनाई आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराने गांभीर्य लक्षात घेवून श्रीक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी देविचा शारदीय नवरात्र महोत्सव हा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त केल्याचे दिसुन येत आहे. या कालावधीत भक्तांना व भाविकांना दर्शनासाठी श्रीक्षेत्र तुळजापूर शहरात वाहनाने अथवा पायी प्रवेश दिला जाणार नाही.कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता तुळजापूर शहरातील जनतेस किंवा भाविकांस शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या कालावधीमध्ये भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी कोणत्याही नवरात्र मंडळास अथवा भाविकास श्रीक्षेत्र तुळजापूर शहरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहेत. श्रीदेवीजींचे शारदीय नवरात्र महोत्सवात पुर्वापार प्रथेप्रमाणे येणारे कुलाचार, धार्मिक विधी व पुजेसाठी आवश्यक असणारे पुजारी, महंत, सेवेकरी व मानकरी यांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.ही परवानगी उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद, उपविभागीय पोलिस अधिकारी तुळजापूर तसेच मंदिर तहसिलदार यांच्या मान्यतेने देण्यात येणार आहे.

(संपादन-प्रताप अवचार)