GOOD NEWS : हिंगोली जिल्ह्यात नऊ रुग्ण कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

शनिवारी कलगाव येथील सहा, सिरसम बुद्रुक, ब्राम्हणवाडा, सुकळी वळण येथील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत २३८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २१० रुग्ण बरे झाले आहेत.

हिंगोली : येथील जिल्हा रुग्णालयातील नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचा अहवाल शनिवारी (ता.२०) आला असून आता २८ रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली.

यामध्ये कलगाव येथील सहा, सिरसम बुद्रुक, ब्राम्हणवाडा, सुकळी वळण येथील प्रत्येकी एका कोरोनामुक्त रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २३८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २१० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचाहिंगोली जिल्ह्यातील अकरा गावे ठरली हॉटस्‍पॉट -

चार हजार १५ संशयित रुग्ण

 सध्या २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये चार, कळमनुरी पाच, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर कळमनुरी तीन, लिंबाळा केअर सेंटर येथे दोन, जिल्हा सामान्य रुग्णालयात बारा, सेनगाव येथे एका रुग्णावर उपचार सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार हजार १५ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते.

२१८ रुग्णांचे अहवाल प्रलंबित

 त्यापैकी तीन हजार ६०३ रुग्णांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी तीन हजार २६९ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या ७३२ संशयित रुग्ण भरती असून त्यापैकी २१८ रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

एका रुग्णाला औरंगाबाद येथे हलविले

वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये कुरेशी मोहल्ला, बुधवार पेठ, अशोक नगरातील प्रत्येकी एक रुग्ण दाखल आहे. तसेच कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाती येथील तीन, डोंगरकडा व टव्हा येथील एक रुग्ण दाखल आहे.तसेच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये तीन रुग्ण उपचार घेत असून यातील एका रुग्णाला औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

येथे क्लिक करा - पत्नीचा मृतदेह सापडला, पतीचा शोध सुरू -

भगवती येथील तीन रुग्ण दाखल

तसेच लिंबाळा येथील केअर सेंटरमध्ये कनेरगाव नाका, संतुक पिंप्री येथील एक रुग्ण दाखल आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात भगवती येथील तीन, खानापूर एक, पेंन्शनपुरा चार, भोईपूरा एक, सम्राट नगर वसमत व जवळा बाजार येथील प्रत्येकी एक रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. याशिवाय सेनगाव येथील कोरोना केअर सेंटरमध्ये कहाकर बुद्रुक येथील रुग्ण उपचारासाठी दाखल आहे.
    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GOOD NEWS: Nine patients coronated in Hingoli district Hingoli News