esakal | नेते व्यासपीठावर येताच ‘गोपीनाथराव मुंडे अमर रहे’च्या घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथगडावर मोठी गर्दी जमली आहे. बंद दाराआड झालेली चर्चा आटोपून पंकजा मुंडे यांच्यासह नेते व्यासपीठावर दाखल होताच ‘गोपीनाथराव मुंडे अमर रहे’च्या घोषणांचा गजर झाला.

नेते व्यासपीठावर येताच ‘गोपीनाथराव मुंडे अमर रहे’च्या घोषणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परळी (जि. बीड) : सकाळी ११ वाजता सुरु होणारा अभिवादनाचा कार्यक्रम प्रत्यक्ष सुरु व्हायला दीड वाजला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड झालेली चर्चा आटोपून पंकजा मुंडे यांच्यासह नेते व्यासपीठावर दाखल होताच ‘गोपीनाथराव मुंडे अमर रहे’च्या घोषणांचा गजर झाला.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला गोपीनाथगडावर मोठी गर्दी झाली आहे. सकाळीच जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे परळीत दाखल झाले होते. पंकजा मुंडे यांचे मौन आणि नाराजी तसेच एकनाथ खडसे यांनी थेट जाहीर केलेली नाराजी या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे काही वेगळा निर्णय घेतील असे अंदाज बांधला जात होता.

खडसेंनी नाव न घेता कुणाला खडसावले?

मात्र, खुद्द पंकजा मुंडे यांनी याचे खंडन केले होते. मात्र, जी काही भूमिका असेल ती गुरुवारी कार्यक्रमात जाहीर करु, असे सांगून सस्पेंसही निर्माण केला होता. दरम्यान, गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील परळीत दाखल झाल्यानंतर श्री. पाटील व पंकजा मुंडे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर दुपारी दिड वाजेच्या दरम्यान या नेत्यांचे व्यासपीठावर आगमन होताच ‘अमर रहे अमर रहे गोपीनाथराव मुंडे अमर रहे’च्या घोषांचा गजर झाला.

पित्याने केला मुलीवर अत्याचार, तिने अशाप्रकारे मागितला न्याय

माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री, बबनराव लोणीकर, प्रकाश मेहता, माजी मंत्री अतुल सावे आदींसह खासदार प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, सुरजितसिंह ठाकूर, नमिता मुंदडा, मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, रमेश आडसकर नेतेही उपस्थित आहेत.