
बीडमध्ये सरकारी वकिलानं कोर्टातच गळफास घेत जीवन सपवल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. व्हीएल चंदेल असं सरकारी वकिलाचं नाव आहे. आता त्यांच्या कुटुंबियांनी या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केलीय. त्यांच्यावर दबाव होता आणि मृत्यूआधी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी आम्हाला दाखवली नसल्याचा आरोप केला आहे.