Gram Panchayat Election: ४८९ जणांचे भवितव्य मतपेटीत बंद; सोमवारी होणार मतमोजणी

शिवशंकर काळे
Friday, 15 January 2021

शुक्रवारी सायंकाळी साडे पाचनंतर मतदान पेट्या सिल करुन पोलिस बंदोबस्तात तहसील कार्यालयात आणण्यात आले. मतपेट्यावर दोन दिवस पोलिस बंदोबस्तात करडी नजर राहणार आहे.

जळकोट (लातूर): तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडे पाचपर्यत ८२.७२ टक्के मतदान झाले आहे. ४८९ जणांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. येत्या सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे.

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या १९५ जागेसाठी एकुण ४८९ उमेदवार रिंगणात आहेत. तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रावर तंतोतंत नियोजन करण्यात आले होते. सकाळी मतदान धिम्या गतीने चालु होते. दुपारी बारानंतर मुंबई, पुणे, हैदाबाद, निजामाबाद, औरंगाबाद येथून मतदार वाहन भरुन येत असल्याने मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार; विधानसभेला मतदान केलेल्यांचे नावं यादीतून गायब

तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी, नायब तहसीलदार राजाराम खरात हे मतदान केंद्रावरील एका एका तासाला माहिती घेत होते. उपजिल्हाधिकारी प्रवीण मेगशेट्टी हे दुरध्वनीवरून तालुक्यातील मतदान केंद्राची माहिती घेत होते.मतदान केंद्रावर अनुसूचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे हे आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह मतदान केंद्रावर भेटी देऊन पाहणी करत होते.

तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती मतदान करण्यासाठी उत्साहात मतदान करण्यासाठी येत होते.कोरोनामुळे मतदारांना मास्क घातल्याशिवाय मतदान केंद्रावर प्रवेश दिला जात नव्हता.प्रतेक मतदान केंद्रावर सँनिटाझरचा वापर केला गेला. तालुक्यातील घोणसी, वाजरवाडा, धामणगाव, रावणकोळा, सोनवळा, बेळसांगवी, कुणकी, या गावातील ग्रामपंचायतीवर तालुक्याचे लक्ष असून येथील शेती चुरशीच्या झाल्या आहेत.

दुर्दैवी ! एकीकडे मतदान सुरु झालं आणि दुसरीकडं उमेदवाराला मृत्यूनं गाठलं

शुक्रवारी सायंकाळी साडे पाचनंतर मतदान पेट्या सिल करुन पोलिस बंदोबस्तात तहसील कार्यालयात आणण्यात आले. मतपेट्यावर दोन दिवस पोलिस बंदोबस्तात करडी नजर राहणार आहे. सोमवारी तहसिल परिसरात नागरिकांनी गर्दी न करता उमेदवार व त्यांचे एंजट उपस्थित रहावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी केले आहे. सोमवारी पोलिस बंदोबस्तात सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार आहे.

तालुक्यात अनेक मतदान केंद्रावर क्रांसिंग मतदान झाल्यामुळे कोण विजयी होणार हे कळणे उमेदवारांना अवघड झाले आहे.त्यामुळे तीन दिवस उमेवारांसाठी विचार करत राञ जागून काढण्याची वेळ आली आहे. तालुक्यात एकुण मतदारांची संख्या ३१३९६ असून त्यात १६६४८ पुरुष तर स्त्री १४७४८ आहेत.यापैकी एकुण २५'३४४ मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी ८२ .७२टक्के झाली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election jalkot political news latur news