Gram Panchayat Election: 'वर्क फ्रॉम होम' करत घडविले देऊळगावमध्ये परिवर्तन

paranda
paranda

परंडा (उस्मानाबाद) : यंदाची ग्रामपंचायत निवडणूक गावगाड्यासाठी अनेक अर्थाने महत्त्वाची ठरली आहे. कोरोना आणि लॉकडाउननंतर झालेल्या या निवडणुकीमध्ये गावागावांमध्ये जणू परिवर्तनाचे 'तुफान' आले आहे. असेच परिवर्तन परंडा तालुक्‍यातील छोट्या पंरतु, राजकीय दृष्ट्या सजग असलेल्या देऊळगाव या गावामध्ये झाले आहे.

'वर्क फ्रॉम होम' करत विशाल गाढवे या तरूणाने गावातील समवयस्कर सहकाऱ्यांना सोबत घेऊन ग्रामपंचायत निवडणूक लढविली. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या आघाडीला ग्रामपंचायतीमधून खाली खेचले. परंडा तालुक्‍यातील देऊळगाव हे डोंजा आणि तांदुळवाडी या दोन मोठ्या गावांच्या मधोमध आहे. या दोन्ही गावांचा देऊळगाववर मोठा प्रभाव आहे. मात्र, राजकीय दृष्ट्या देऊळगावचा स्वतंत्र असा विचार आहे.

येथे गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांच्या आघाडीची सत्ता आहे. यंदा मात्र गाढवे आणि इतर तरूणांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून येथे परिवर्तन घडवून आणले आहे.

225 मतदान झालेल्या वार्ड क्रमांक दोनमधून विजयी झालेल्या अनुराधा विशाल गाढवे यांना तब्बल 142 मते मिळाली असून त्यांचा 62 मतांनी विजय झाला आहे. तर 407 मतदान झालेल्या वार्ड क्रमांक एकमधील विकास रमेश गाढवे यांना सर्वाधिक 260 मते मिळाली आहेत.

निवडणुकीत गावकऱ्यांचा मिळालेला भरभरून पाठिंबा पहाता, या उमेदवारांकडून देखील गावाच्या विकासाची मोठी अपेक्षा आहे. निवडणुकीसाठी सात उमेदवार जरी असले तरी यांच्या पाठीमागे अहोरात्र कष्ठ घेणारे हजारो हात आहेत. यामध्ये प्रमुख्याने माजी सरपंच प्रकाश गाढवे, सुरेशदादा गाढवे, संतोष गाढवे, गणेश गाढवे, नागेश गाढवे, बंडू बदर, तानाजी ढवळे, शिवाजी ढवळे, रावसाहेब गाढवे, नितीन गाढवे, त्रिंबक गाढवे आदींचा समावेश आहे. 

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते 
अनुराधा विशाल गाढवे (142), प्रयागाबाई त्रिंबक गाढवे (259), विकास रमेश गाढवे (260), कोमल बालाजी गाढवे (247), आबासाहेब जनार्दन गाढवे (145), शालन बापुराव भाग्यवंत (144), मनिषा हजारे (135)

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com