esakal | ग्रामपंचायत निकाल :  परभणीमध्ये कही खुशी कही गम, अनेक गावात सत्तांतरण तर अनेक गावात गड राखले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बहुतांश ठिकाणी सत्ताधार्‍यांना मतदारांनी डावलले आहे. मात्र विकास काम करणारे काही सत्ताधिकारी मात्र कायम राहिले आहेत.चुरशीच्या निवडणुकीमध्ये मात्र अनेक मातब्बर पराभूत झाले आहेत.

ग्रामपंचायत निकाल :  परभणीमध्ये कही खुशी कही गम, अनेक गावात सत्तांतरण तर अनेक गावात गड राखले

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतची मतमोजणी सोमवारी ( ता.१८ ) रोजी शांततेत पार पडली.  आठ फेर्‍यांमध्ये ५५ ग्रामपंचायत मधील एकुण १६८ प्रभागातील ४१० उमेदवार निवडूण आले आहेत. बहुतांश ठिकाणी सत्ताधार्‍यांना मतदारांनी डावलले आहे. मात्र विकास काम करणारे काही सत्ताधिकारी मात्र कायम राहिले आहेत.चुरशीच्या निवडणुकीमध्ये मात्र अनेक मातब्बर पराभूत झाले आहेत.

तालुक्यात पहिल्या टप्यात ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला होता.त्यातील बारा ग्रामपंचायती गावातील पुढार्‍यांनी बिनविरोध निवडूण आणल्या उर्वरित ५५ ग्रामपंचायतीसाठी ( ता.१५ ) रोजी मतदान झाले.मतदानाचा निकाल सोमवारी जाहिर झाला.गावपातळीवरिल या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये अनेक गावात सत्तांतर झाले तर अनेक गावात पूर्वीच्याच पुढार्‍यांना पसंती देत मतदारांनी त्यांच्या पॅनलला निवडूण दिले.निवडणूकांचे जस जसे निकाल बाहेर येत होते.तस तसे उमेदवार आपल्या नेत्यांच्या कार्यालयात येवून गर्दी करित होते.तर जे उमेदवार निवडणूकीत हारले ते उमेदवार त्यांनी मात्र आपल्या गावाचा रस्ता धरत गाव जवळ केले.

हेही वाचानांदेडमध्ये थरार : शिवाजीनगरच्या व्यापाऱ्यावर वजिराबादमध्ये प्राणघातक हल्ला

वालूर ग्रामपंचायतवर साडेगावकर व मूंढे गटाचे वर्चस्व.

तालूक्यातील सर्वात मोठी १७ सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत वालूर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे तालूकाध्यक्ष संजय साडेगावकर व माजी उपसाभापती गणेश मूंढे यांच्या पॅनलने बाजी मारली असून ११ जागेवर विविध प्रभागातून उमेदवार निवडूण आणण्यात यश आले आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने यांच्या पॅनलला परभावाचा सामना करावा लागला आहे. 

चार ग्रामपंचायत मध्ये लक फॅक्टर...

चार ग्रामपंचायतमधील उमेदवारांना  समान मते मिळाल्यामूळे त्यांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. त्यामध्ये नांदगाव, सोनवटी, धनेगाव व झोडगाव या गावाचा समावेश आहे. या ठिकाणी समसमान मते पडल्यामूळे तेथे चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली.या ग्रामपंचायतमध्ये उमेदवारांसाठी लक फॅक्टर महत्वाचा ठरला.

ग्रामपंचायत निवडणूकीत 'कोरोना'चा इन्फॅक्ट ग्रामपंचायत निवडणूकीत प्रकाशाने जाणवला.जे नागरिक कामानिमित्त बाहेरगावी त्यांना कोरोनाच्या काळात पूर्वीच्या ग्रामपंचायत कारभार्‍यांनी साधे विचारले नाही.उलट त्यांना गाव बंदी केली होती.त्याच मतदारांनी या निवडणूकीत आपला राग व्यक्त करित त्यांना चांगलाच धडा दिला असल्याचे या निवडणूकीत पहावयास मिळाले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image