ग्रामसेवकच कार्यालयात थुंकले, पुढे घडले असे की, वाचून तुम्ही होणार थक्कच ! 

राम काळगे 
Sunday, 6 September 2020

शासकीय कार्यालयात अथवा सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ खावून कोणी थुंकले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाते. विशेषता ग्रामीण भागातील कार्यालयातील जिन्याचे कोपरे नेहमीच लाल झालेले दिसतात. मात्र, निलंगा तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात आलेल्या ग्रामसेवकानेच सुपारी खावून पिचकारी मारल्याने संतापलेल्या गटविकास अधिकार्यांनी ग्रामसेवकाला पाच हजाराचा दंड सुनावला आणि वसुल ही केला. हा कारवाईची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.   

निलंगा (लातूर) : येथील एका ग्रामसेवकांनी कार्यालयाच्या आवारात सुपारी खावून पिचकारी मारली. अन् दौऱ्यावरून आलेल्या गटविकास आधिकार्याच्या ही बाब नजरेस पडली. तेव्हा त्यांनी चक्क ग्रामसेवकावर कारवाई करुन पाच हजार रूपयाची पावती दिली. अखेर त्या ग्रामसेवकाला सर्वोच्च दंड द्यावा लागला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

येथील तहसील कार्यालयापाठोपाठ पंचायत समितीचे गटविकास आधिकारी अमोल ताकभाते यांनीही स्वतः हातात झाडू घेऊन कार्यालयाची स्वच्छता केली आहे. येथील पंचायत समितीची इमारतही नवीन असून कोट्यावधी रूपये खर्च केले आहेत. तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने सतत ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, नागरीकांची मोठ्या प्रमाणात या कार्यालयात वर्दळ असते. या सुसज्ज इमारतीत शालेय शिक्षण विभाग, पशूसंवर्धन, एकात्मिक बालविकास विभाग, जिल्हापरिषद बांधकाम उपविभाग, लघू पाटबंधारे पाणीपूरवठा विभाग यासह विविध विभागाचा कारभार चालतो. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वच कार्यालये एकत्रित असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आपले काम करणे सोपे झाले आहे. कार्यालय एकाच इमारतीत असल्याने त्यांची गैरसोय दूर होते. मात्र कार्यालयातील विविध कोपरे तंबाखूजन्य पदार्थ खावून लाल झाले आहेत. तर एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्याचे कोपरे, खिडक्या सुपारी खावून थुंकल्याने घाण झाल्या आहेत. मुतारी, शौचालय यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण झाली आहे. येथील तहसीलदार गणेश जाधव यांनी स्वतः आपल्या कार्यालयाची स्वच्छता केली होती.  शिवाय असा उपक्रम घेत अन्य कार्यालयानी स्वच्छता राखावी असे आवाहन बातमीत केले होते. याची दखल घेत गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी स्वतः आपल्या कार्यलयाची स्वच्छता केली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

शिवाय कार्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खिशामध्ये घेऊन येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकप्रतिनीधीला आता कार्यालयाबाहेरच आपली तल्लफ भागवावी लागणार असून कार्यालयात अथवा कार्यालयाच्या खिडकीतून पिचकारी मारणाऱ्या सुपारी शौकीनाची गोची झाली आहे. आतापर्यंत अशा प्रकारे केलेल्या दंडाच्या माध्यमातून बारा हजार रुपये जमा झाले असल्याची माहिती गटविकास अधिका-यांनी दिली. 

ग्रामसेवकालाच पाच हजाराचा दंड 
शासकीय कामासाठी आलेल्या ग्रामसेवकाने सुपारीची पिचकारी मारली हे दृश्य स्वतः गटविकास अधिकाऱ्यांनी पाहिले. त्या ग्रामसेवकाला सर्वाधिक ५ हजार रुपयांचा दंड द्यावा लागला. त्यामुळे यापुढील काळात शासकीय कर्मचारी असो अथवा ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकप्रतिनिधी, नागरिक असो त्यांना सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयांमध्ये विद्रूप केल्याप्रकरणी दंड भरावा लागणार आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Group development officer action on Gramsevak