साडेचार लाखांच्या तंबाखूसह गुटखा जप्त 

जालना : जप्त केलेल्या साडेचार लाखांच्या तंबाखू, गुटख्याच्या साठ्यासह पोलिसांचे पथक. 
जालना : जप्त केलेल्या साडेचार लाखांच्या तंबाखू, गुटख्याच्या साठ्यासह पोलिसांचे पथक. 

जालना -  शहरात अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांनी आपल्या पथकासह बुधवारी(ता.२७) ठिकठिकाणी छापे टाकून तब्बल चार लाख ४७ हजार १६८ रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. 

लॉकडाउनच्या काळात चढ्या भावाने अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. मात्र, याकडे अन्न व औषध प्रशासनाचा कायम काणाडोळा आहे. त्यामुळे गुटखा माफियांवर चक्क अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांनी आपल्या पथकासह छापे टाकण्यास सुरवात केली आहे.

अपर पोलिस अधीक्षक श्री. पवार यांनी बुधवारी आपल्या पथकासह चंदनझिरा पोलिस ठाणे, कदीम जालना पोलिस ठाणे आणि सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून चार लाख ४७ हजार १६८ रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. यात नवीन मोंढा येथे अमर रमेश जैन याच्या अमर ट्रेडर्स, कन्हैय्या रमेश खेरूडकर याच्या खेरूडकर ट्रेडर्स येथे छापा टाकून एक लाख ८० हजार ४४२ रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. तर जुना मोंढा येथील राजेश रमेश खेरूडकर याच्या विश्वनाथ ट्रेडर्स येथे छापा टाकून एक लाख १६ हजार ७२६ रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. तसेच जुना जालना येथील सोनलनगर येथील विश्वनाथ सोनाजी भुसारे याच्या ताब्यातून दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. 

दरम्यान, याप्रकरणी चंदनझिरा, कदीम जालना आणि सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 
ही कारवाई पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, कर्मचारी प्रदीप घोडके, विशाल काळे, ज्ञानेश्वर केदारे, शिवाजी डुखुरे यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com