esakal | गावठी दारु विक्रेत्यांचे चांगभलं
sakal

बोलून बातमी शोधा

NND15KJP02.jpg

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व परवानाधारक देशी-विदेशी दारु, परमीट रुम, बिअरबार बंदचे आदेश बजावले आहेत. यामुळे सर्व दारु दुकान बंद झाल्यामुळे तळीरामांचा हिरमोड झाला होता. त्यांनी हव्या त्या मार्गाने दारु उपलब्ध करुन घेण्याचा चंग बांधला. यामुळे अवैधरित्या देशी-विदेशी दारु विक्री करणारे तसेच गावठी दारु काढणारे अधिकच्या दराने दारुची विक्री करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाइ करत सहा ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे.

गावठी दारु विक्रेत्यांचे चांगभलं

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. अधिकच्या लोकांनी एकत्रीत येवू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी दारु तसेच बिअरबार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दारुबंदीचा फायदा उचलत जिल्ह्यातील गावठी (हातभट्टी) दारु विक्रेत्यांनी घेत हातोहात हातभट्टी शौकीनांना पुरविली जात आहे. अवैध देशी व गावठी दारुविक्री प्रकरणी सहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

प्रतिबंधात्मक उपाय योजननेसार दारुबंदी
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा ता. १३ मार्चपासून लागू करून करून खंड दोन, तीन व चारमधील तरतुदीनुसार ता. १४ मार्चपासून अधिसूचना निर्गमित केली आहे. या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. यात मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व परवानाधारक देशी-विदेशी दारु, परमीट रुम, बिअरबार बंदचे आदेश बजावले आहेत. यामुळे सर्व दारु दुकान बंद झाल्यामुळे तळीरामांचा हिरमोड झाला होता. त्यांनी हव्या त्या मार्गाने दारु उपलब्ध करुन घेण्याचा चंग बांधला. यामुळे अवैधरित्या देशी-विदेशी दारु विक्री करणारे तसेच गावठी दारु काढणारे अधिकच्या दराने दारुची विक्री करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाइ करत सहा ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा.....शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्ज खात्यात तब्बल ८५० कोटी २३ लाख जमा

देशी दारु बाळगली
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव मधील सिध्दार्थनगर येथे विनापरवाना साडेसात हजाराची देशी दारु चोरट्या मार्गाने विक्रीसाठी बाळगल्याचे गुरुवारी (ता. २६) आढळून आले. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथे गुरुवारी (ता. २६) विनापरवाना साडेचार हजाराची देशी दारु चोरट्या मार्गाने विक्रीसाठी बाळगल्याचे आढळून आले. या प्रकरणी कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निसर्ग हॉटेल निळा रोड येथे एकाने बेकायदेशीर साडेअकरा हजाराची देशी दारु चोरट्या मार्गाने विक्रीसाठी बाळगल्याचे गुरुवारी (ता. २६) आढळून आले. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलेच पाहिजे....खासगी रुग्णालय सुरु ठेवण्याचे आदेश

किनवटमध्ये गावठी दारुचा उच्छाद
दारुबंदी आदेशाच्या काळात किनवट तालुक्यात गावठी दारु काढणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. तालुक्यातील पाटोदा येथे विनापरवाना साडे दहा हजार रुपये किमंतीची गावठी दारु अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे गुरुवारी (ता. २६) आढळून आले. या प्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेतही पाटोदा येथे गुरुवारी (ता. २६) यातील आरोपींनी अकरा हजार दोनशे रुपयांची गावठी दारु अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे आढळून आले. या प्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटनाही पाटोदा येथे घडली. आरोपींनी साठ हजार सहाशे रुपयाची गावठी दारु अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे गुरुवारी (ता. २६) आढळून आले. या प्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
    
 

loading image
go to top