esakal | आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात कोविड किटचा गोंधळ सुरु, सदोषतेमुळे चाचण्या रखडल्या !  

बोलून बातमी शोधा

corona kit jalna.jpg}

जालना येथे कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीसाठी आरटीपीसीआर प्रयोगशाळा आहे. मात्र, सोमवारी (ता.१२) या प्रयोगशाळेतून एक ही कोरोनाबाधित अहवाल आला नाही. दरम्यान सोमवारी रात्री उशिरा कोरोना चाचणीसाठी नवीन किट दाखल झाल्या. त्यामुळे सोमवारी प्रलंबित शेकडो स्वॅबच्या नमुन्यांपैकी सुमारे ४७० स्वॅबची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ८७ स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ३८३  स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य यंत्रणेकडून मंगळवारी (ता.१३) सकाळी सांगण्यात आले आहे.

आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात कोविड किटचा गोंधळ सुरु, सदोषतेमुळे चाचण्या रखडल्या !  
sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : कोरोना चाचण्यांसाठी आवश्यक असलेल्या किटचा गोंधळ संपण्यास तयार नाही. जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने नव्याने मागवलेल्या पाच हजार कोरोना चाचणी कीट सोमवारी (ता.१२) रात्री उशिरापर्यंत जालन्यात दाखल झाल्या नाही. परिणामी सोमवारी जिल्ह्यात केवळ अँटीजेन तपासणीद्वारे केवळ एकच कोरोनाबाधित आढळून आला आहे. तर शेकडो कोरोना चाचण्या प्रलंबित राहिले आहेत. दरम्यान सोमवारी रात्री उशिरा कोरोना चाचणीसाठी नवीन किट दाखल झाल्या. त्यामुळे प्रलंबित शेकडो स्वॅबच्या नमुन्यांपैकी सुमारे ४७० स्वॅबची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ८७ स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ३८३  स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य यंत्रणेकडून मंगळवारी (ता.१३) सकाळी सांगण्यात आले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दरम्यान रात्री उशिरा कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेल्या नवीन कीट दाखल होणार असून जालना येथील आरटीपीसीआर प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या शेकडो स्वॅबचे नमुने रात्री उशिरापर्यंत तपासले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी 'सकाळ'ला दिली. हे कितीही खरे असले तरी आरोग्यमंत्री आपल्याच जिल्ह्यातील कोरोनाचा तिढा सोडण्यास अपयशी ठरले की काय अशी चर्चा जिल्ह्यात सुरु झालेली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
जालना येथे कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीसाठी आरटीपीसीआर प्रयोगशाळा आहे. मात्र, सोमवारी (ता.१२) या प्रयोगशाळेतून एक ही कोरोनाबाधित अहवाल आला नाही. त्याच मुख्य कारण म्हणजे सदोष कोरोना चाचणी कीट असल्याचे पुढे येत आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात पाच हजार कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेल्या कीट जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. मात्र, त्या कीट सदोष असल्याचे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्या किटचा कोरोना चाचणीसाठी वापर करणे थांबविण्यात आला होता. तात्पुरत्या स्वरूपात दीड हजार कीट जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने मागविल्या होत्या, त्यानंतर मागील दोन दिवसांमध्ये तब्बल ३७९ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना चाचणीद्वारे निष्पन्न झाले होते. मात्र या कीट संपल्याचे चित्र आहे. तसेच सोमवारी (ता.१२) नवीन येणाऱ्या पाच हजार कोरोना चाचणी कीट रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात दाखल झाल्या नव्हत्या. परिणामी सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात अँटीजेन तपासणीद्वारे केवळ एकच कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


दरम्यान नवीन मागविल्या कोरोना चाचणी कीट रात्री उशिरा जिल्ह्यात दाखल होणार आहेत. या कीट दाखल झाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा जालना येथील आरटीपीसीआर प्रयोगशाळेत शेकडो प्रलंबित व्यक्तींच्या स्वॅबची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये कोरोनाबधितांची संख्या ही शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. 

चौकशीसह कारवाईची मागणी 
जिल्ह्यात पाच हजार सदोष किटचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे या कीट प्रयोग शाळेत पडून आहेत. ही बाब आरोग्य यंत्रणेने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. दरम्यान, सदोष कीट पुरवठा करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे नेते माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. 


 
जीसीसी कंपनीच्या किट महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात पुरवठा झाल्या असतील त्या बाबत एनआयव्हीचा रिपोर्ट मागितला आहे. या किट कोरोना चाचणीसाठी वापरू नये,असा अहवाल त्यांच्याकडून प्राप्त झाला आहे. पुढील काळात अशा घटना घडू नये यासाठी एक समिती स्थापन करावी लागेल, त्यात एनआयव्हीचे तज्ज्ञ ही असतील. ज्या कंपन्या सदोष किट देतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल 
- राजेश टोपे, आरोग्य मंत्री, 


सदोष किटचा वापर करून कोरोना चाचणी करून उपयोग होणार नाही. त्यामुळे नवीन कीट मागविल्या आहेत. कीट प्राप्त होताच रात्री उशिरापर्यंत तत्काळ प्रलंबित स्वॅबची कोरोना चाचण्या केली जाईल. 
- रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना. 

(Edited By Pratap Awachar)