esakal | हृदय पिळवटून टाकणारी भोकरदनची घटना : गव्हाला पाणी देण्यास गेलेल्या तीन भावांचा शॉक लागून विहीरीत पडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

rajur 3 brother.jpg

भोकरदन तालूक्यातील पळसखेडा पिंपळे या गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तीन सख्ख्या भावांना विजेचा शॉक लागून ते विहिरीत पडले अन् तिघांचाही मृत्यू झाला. एकमेकास वाचविण्यात तिघांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जालना जिल्ह्याच हादरला आहे. काही क्षणात घरातील तिघांचा मृत्यू होणे किती धक्कादायक असून त्याची कल्पनाच हृदय पिळवटून टाकणारी आहे

हृदय पिळवटून टाकणारी भोकरदनची घटना : गव्हाला पाणी देण्यास गेलेल्या तीन भावांचा शॉक लागून विहीरीत पडून मृत्यू

sakal_logo
By
ज्ञानेश्वर पुंगळे

भोकरदन (जि. जालना) : भोकरदन तालूक्यातील पळसखेडा पिंपळे या गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तीन सख्ख्या भावांना विजेचा शॉक लागून ते विहिरीत पडले अन् तिघांचाही मृत्यू झाला. एकमेकास वाचविण्यात तिघांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जालना जिल्ह्याच हादरला आहे. काही क्षणात घरातील तिघांचा मृत्यू होणे किती धक्कादायक असून त्याची कल्पनाच मन हेलावून टाकते. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी(ता.१८) रात्री

पळसखेडा पिंपळे येथील ज्ञानेश्‍वर अप्पासाहेब जाधव (२६), रामेश्‍वर अप्पासाहेब जाधव (२६) व सुनिल अप्पासाहेब जाधव (१८) या तिघा भावांचा मृत्यूत समावेश आहे. 

नऊ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्‍वर, रामेश्‍वर, सुनिल हे तिघे भाऊ शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी देण्यासाठी एकाने विहीरीवरील विद्युत पंप सुरु केला. यावेळी क्षणार्धात त्याला विजेचा शॉक लागला आणि तो बाजलाच असलेल्या विहीरीत कोसळला. ही बाब अन्य दोन भावांच्या लक्षात आली. त्याला वाचविण्यासाठी दोघांनीही विहीरीत उडी घेतली. मात्र, तीघांचाही विहीरीत बुडून मृत्यू झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बराच वेळ झाले तीनही मुले घरी का आले नाहीत म्हणून घरची मंडळी चिंता करू लागली. तिघांपैकी कोणाचाही फोनचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे जाधव कुटुंबातील अन्य लोकांनी याबाबत नातेवाईकांना व आपल्या आसपास असलेल्या नागरीकांना सांगीतले. त्यानंतर मध्यरात्रीच त्यांच्या शोधासाठी गावातील लोक गेले. तेव्हा त्यांना तिघेही भाऊ विहीरीत पडलेले दिसले. यासंदर्भात हसनाबाद पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोडके हे दाखल झाले. घटनास्थळाचे पंचनामे करण्यात आले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नवीन आयुष्याची नुकतीच केली होती सुरुवात
मृत झालेल्या तिनही भावांपैकी ज्ञानेश्‍वर हा सर्वात मोठा. तीन महिन्यांपुर्वीच त्याचा विवाह झाला होता. नवीन आयुष्याला नुकतीच सुरुवात झाली होती. घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. एवढ्यात सुखी संसारात काळाने अतिविचित्र घाला घातला. तर मृत रामेश्‍वर आणि सुनील हे दोघे औरंगाबादेत कंपनीत काम करीत असत. कोरोनाच्या सावटानंतर सुरक्षीतता म्हणून त्यांनी कंपनीतील नोकरी सोडून ते गावी गेले होते. त्यात लॉकडाऊन आले. नंतर शेतीतील कामे आली. त्यामुळे  गावीच रमले गेले. त्यांना कोठे माहित होते की, नियतीने त्यांच्याबद्दल काय लिहून ठेवले आहे. 

जाधव कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
घरातील कर्तेधर्ते युवक गेल्याने जाधव कुटुंबिंयावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपुर्ण जालना जिल्हा दादरला आहे.  विहीरीच्या बाहेर मृतदेह काढल्यानंतर अख्खे गाव त्यांना पाहायला आहे. यावेळी  नुसताच आक्रोश झालेला होता. डोळ्यात पाणी आणि कंठ दाटलेला गावकरी निशब्दपणे उभा होता. 

(संपादन-्प्रताप अवचार)

loading image