esakal | लोहारा तालुक्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस; फळबागांचे मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

rain

लोहारा तालुक्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस; फळबागांचे मोठे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोहारा (उस्मानाबाद): शहरासह तालुक्यातील अनेक भागात रविवारी (ता. २५) सांयकाळी पाऊणेपाचच्या सुमारास मेघ गर्जनेसह सुरू झालेला वादळी पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. अचानक झालेल्या वादळी पावसात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

मागील आठ दिवसांपासून तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. रविवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळी पाऊणेपाचच्या सुमारास शहरासह तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसास सुरवात झाली.

हेही वाचा: दिलासादायक! मराठवाड्यात रिकव्हरी रेट वाढला, रुग्णवाढ घटली

तालुक्यातील मार्डी, खेड, कानेगाव, कास्ती, नागूर, भातागळी, नागराळ, बेंडकाळ, धानुरी, मोघा, हिप्परगा (रवा), माळेगाव, वडगाव, लोहारा, (खुर्द), उंडरगाव आदी भागात जोरदार पाऊस झाला. सांयकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या वादळी पावसाचा फटका फळबागांना बसला आहे. द्राक्ष, आंबा, केळी बागांचे नुकसान झाले.

हेही वाचा: रक्तगटानुसार WhatsApp Group तयार, नातेवाईकांची धावपळ झाली कमी

आठ दिवसांपासून उष्णतेत मठी वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक उष्णतेने हैराण झाले होते. मात्र, या झालेल्या वादळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.

loading image