esakal | उमरगा जलमय : गुलबर्गासह तालुक्यातील दहा मार्गावरील वाहतूक ठप्प 
sakal

बोलून बातमी शोधा

Umarga paus 14.jpg
  •  
  • सोयाबीन गेले वाहुन. 
  • उमरगा शहर जलमय ; मुलगी थोडक्यात बचावली !

उमरगा जलमय : गुलबर्गासह तालुक्यातील दहा मार्गावरील वाहतूक ठप्प 

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा : शहरासह तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण शिवार जलमय झाले आहे. अगोदरच पाण्याखाली गेलेल्या सोयाबीनची काढणी दमछाक करून करावी लागली. गंजी सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या मात्र आता त्या पाण्यात अडकल्या आहेत. दरम्यान कोरेगाव, बेडगा, गुंजोटी, कुन्हाळी, भूसणी, गुगळगांववाडी, दगडधानोरा, आष्टा आदी मार्गावरील नाल्याच्या पुलावरुन पाणी जात असल्याने वहातूक ठप्प आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

उमरगा तालुक्यात गेल्या आठ दिवसापासुन कमी -अधिक प्रमाणात पाऊस झाला होता. मात्र मंगळवारी रात्रभर झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटुन शिवार जलमय झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या परिश्रमातून सोयाबीनची काढणी गंजी उभारल्या होत्या मात्र त्या आता पाण्यात अडकल्या आहेत. ओढे, नदी काठच्या शेतातील गंजी वाहुन गेल्या आहेत. अनेक ठिकाणी गंजीत पाणी शिरल्याने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊसाची स्थितीही भयावह आहे, ऊसाच्या अनेक क्षेत्रात पाणी साचले आहे. जमिनीची मातीही वाहून गेल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अनेक मार्गावरील वाहतूक बंद
 अतिवृष्टीने तालुक्यातील अनेक मार्गावरील पुलावरून पाणी जात असल्याने वहातूक बंद आहे. उमरगा - निलंगा मार्गावरील कुन्हाळी गावाजवळील पुलावरून पाणी जात असल्याने वहातूक ठप्प आहे. डिग्गी मार्गावरील बेडगा गावाजवळील फरशी पुल वाहुन गेल्याने येथील वहातूकही बंद आहे. मळगीवाडी गावाजवळील पुलावरून पाणी जात असल्याने दगडधानोरा ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. गुंजोटी गावातील पुलावरून पाणी वहात असल्याने वहातूक बंद आहे. भूसणी व गुगळगाववाडी येथील पुलावरून पाणी जात असल्याने वहातूकीचा पर्याय उरला नाही. उमरगा - गुलबर्गा मार्गावरील कसगीच्या सिद्धश्वर मंदिराजवळून जाणाऱ्या बेन्नीतूरा नदीवरील पुलावरून पहिल्यांदाच पाणी गेले आहे, त्यामुळे हा मार्ग बंद आहे. दरम्यान दाळींब व येणेगुर गावात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चूकीमुळे अनेक घरात पाणी शिरले आहे. नारंगवाडी पाटी परिसरातील अनेक शेतात पाणी शिरले आहे. उमरगा - लातूर मार्गाचे काम करताना ठेकेदाराने पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी पर्यायी मार्ग न केल्याने अशी अवस्था झाल्याची माहिती पांडूरंग सांगवे यांनी सांगितली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उमरगा शहर जलमय ; मुलगी थोडक्यात बचावली !

उमरगा शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून दोन ते तीन फुट पाणी वहात असल्याने बुधवारी सकाळी तीन तास वहातूक ठप्प होती. या परिसरातील गणेश थियेटर, तसेच अनेक दुकानात पाणी शिरले. शेंडगे, बेडदुर्गे हॉस्पिटलचा परिसर पाण्याखाली आहे. मदनानंद कॉलनीतही पाणी शिरले आहे. दरम्यान शहरातील मलंग प्लाट, मुन्शी प्लॉट, पतंगे रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरले आहे.

एकोंडी रोडलगतच्या संताजी सगर, राजेंद्र साळूंके, प्रतिभा घोटाळे, जगतराज चौधरी, सुजाता कुलकर्णी आदीं नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. यापूर्वी दोन वेळा हा परिसर जलमय झालेला होता मात्र पालिकेच्या निष्क्रीय पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कांहीही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत त्यामुळे पुन्हा हा परिसर जलमय झाला आहे. दरम्यान मुन्शी प्लॉट भागातील पाच वर्षीय कोमल कुलकर्णी मात्रे नाल्यात वाहून जात असताना वडिलांनी सतर्कतेने तिला बचावले.

(संपादन-प्रताप अवचार)