esakal | हैद्राबादच्या लता जैस्वालकडून गरजवंतांच्या जेवणासाठी मदत
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

इतर आजाराप्रमाणेच ‘कोरोना’चे संकट लवकर दुर होईल असे सर्वांनाच वाटत होते. परंतु, विदेशासह देशातही कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक मजुर घरी पोहचु शकले नाहीत. विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या शहरांमध्ये अडकून पडले आहेत. अशा घरापासून दुर असलेल्यांचा जेवणाचा प्रश्न निर्माण होताच लायन्सचा डबा धावून आला. लायन्सकडून दररोज भुकेल्यांना जेवणाचा डबा पुरविला जात आहे. 

हैद्राबादच्या लता जैस्वालकडून गरजवंतांच्या जेवणासाठी मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : उन्हाळा येताच अनेकजन सह कुटुंब देश - विदेशात सहलीवर जाण्यासाठीचे नियोजन करतात. यासाठी सहा महिण्यापासून त्यांची तयारी सुरु होते. मग मनासारखा प्रवास आणि ठिकाण निवडण्यासाठी ट्रॅव्हल, रेल्वे, विमानाचे तिकीट आणि प्रेक्षणीय स्थळी असणारे प्रसिद्ध हॉटेल देखील बुक करुन ठेवतात. हैद्राबादच्या लता जैयस्वाल यांनी देखील नांदेडहून चारधाम यात्रेसाठी निघणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स एजन्सिकडे प्रवासाची आर्धी रक्कम देऊन बुकींग करुन ठेवली होती. ‘कोरोना’मुळे यात्रा रद्द झाल्याने त्या महिलेने पैसे परत न घेता ही जमा रक्कम लायन्सच्या डब्यासाठी देवून सामाजिक दायित्व जपले आहे. 

नवीन देणगीदारांमध्ये अली पंजवानी, एमजीएम मेकॅनिकल बँचचे विद्यार्थी सुनील साबू, महादेव अकमार शिरडशहापूर, अनुराधा मजगे लातूर,  अविका सतेजसिंह राजपूत, अस्मिता आनंद तेरकर, सुकांती दीपक सबनीस, आनंद तेरकर यांनी जेवण्याच्या डब्यांसाठी मदत केली आहे.

हेही वाचा- आनंदाची बातमी : हिंगोलीतील कोरोनाबाधित रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह

यात्रेला न जाताही मिळाले समाधान

२६ एप्रिलपासून चारधाम यात्रा सुरु होणार होती. या यात्रेसाठी लता जैस्वाल यांनी एकुण रक्कमेच्या आर्धी रक्कम जमा केली होती. लॉकडाऊनमुळे यात्रा रद्द करण्यात आली. त्यामुळे लता जैस्वाल यांनी चारधाम यात्रेला जाऊन मनःस्वास्थ्य लाभणार होते. पण यात्राच रद्द झाली असल्यामुळे या पैशातून गरजू लोकांना भोजन देण्याच्या कामी आले आहे. याचा मला वेगळा आनंद तर मिळालच, शिवाय मोठे समाधानही मिळाले आहे.   

हेही वाचा- परभणीत तीन दिवस संचारबंदी

लॉकडाऊन संपेपर्यंत मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन

दरम्यान लॉयन्सच्या डब्यामध्ये शुक्रवारी (ता.१७ एप्रिल २०२०) रोजी सहाशे डबे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत हजारो डब्याची नोंदणी झाली. बावीस दिवसांपासून शराच्या विविध भागांतील गरजूंना डबे वितरित केले जात आहेत.  लायन्स क्लब नांदेड सेंट्रलकडे सध्या फक्त दोन हजार ८०० डबे शिल्लक असून, चार दिवसानंतर पूर्ण साठा संपणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अन्नदात्यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम चालण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष विजय भारतीया, उपाध्यक्ष संजय अग्रवाल, सचिव डॉ. मोहन चव्हाण, कोषाध्यक्ष शिवा शिंदे यांनी केले आहे.

loading image