हिंगोली : काळ्या बाजारात जाणारा ११२ क्विंटल धान्य साठा जप्त

file photo
file photo

हिंगोली-  सेनगाव  शहरातून एका खाजगी गोदामातून रिसोडच्या दिशेने काळ्या बाजारात जाणारा ११२ क्विंटल रेशनचा धान्य साठा हिंगोली पोलिसांनी बुधवार ता. ५ मध्यरात्री जप्त केला आहे.

विशेष म्हणजे ही कार्यवाही सेनगाव पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर झाली असून यात १८ लाख रुपये किंमतीच्या एकूण २२४ पिशव्या आणि ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. त्याचबरोबर सात जणांविरुद्ध सेनगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही रात्री १२ ते १ च्या दरम्यान करण्यात आली आहे. 

खाजगी दुकानातून राशन वाटपाच्या दोन सरकारी मशीन देखील जप्त करण्यात आल्या आहेत. सेनगाव पोलीस स्टेशनच्या बाजूलाच पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे, सेनगाव पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पुढील तपास हिंगोली ग्रामीण पोलिस निरीक्षक चिंचोलकर हे करीत आहेत.

सेनगाव शहरात मागच्या काही दिवसांपासून हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या  पोलिसांनी अवैध व्यवसाया बाबत कारवाई सुरू केली असल्याने स्थानिक पोलिसांच्या कामगीरी बाबत चर्चा सुरू आहे. यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्यावर देखील छापा मारुन मोठ्या प्रमाणावर नगदी रक्कम दूचाकी वाहने, मोबाईल असा ऐवज जप्त केला होता. परत राशनच्या काळा बाजार देखील उघकीस आणला आहे. या विषयी उलट सूलट चर्चा शहरात सुरू आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com