हिंगोली @ ९१ : रिसाला बाजार परिसराच्या तीन किमीपर्यंत प्रवेश बंदी

hingoli photo
hingoli photo

हिंगोली : शहरातील रिसाला बाजार परिसरातील एका रुग्णाचा कोरोना (कोविड-१९) अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रिसाला बाजार परिसरातील तीन किलोमीटर परिसर प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात रिसाला बाजार भागातील एका रुग्णास जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा थ्रोट स्वॅब अहवाल प्राप्त झाला असून तो 'पॉझिटिव्ह' आला आहे.

चारही दिशेच्या अंतिम सीमा सील

 त्यामुळे रिसाला बाजार भागातील तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर सील करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला आहे. या भागात नागरिकांना, वाहनास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार प्रतिबंधित कंटेनमेंट झोनच्या तीन किलोमीटर परिसरातील चारही दिशेच्या अंतिम सीमा सील करण्यात आल्या आहेत. 

तीन किलोमीटरपर्यंत परिसराचा समावेश

यात रिसाला बाजार येथे रुग्ण आढळलेला भाग, अकोला बायपास रोड, उत्तर भाग, एनए १६१ बायपास भाग, कयाधू नदीभाग, नांदेड बायपास भाग तीन किलोमीटरपर्यंत सील करण्यात आला आहे. तसेच हिंगोली शहरातील आदर्श कॉलेज, रिसाला बाजारचा भाग, गारमाळ, रिसाला, शिवाजीनगर, महसूल कॉलनी, बियाणीनगर, नारायणनगर, सरस्वतीनगर, खुशालनगर, साईनगर
या परिसराचा समावेश आहे.

विविध नगरात प्रवेश बंदी

तसेच इंदिरानगर, कमलानगर, हमालवाडी, सिद्धार्थनगर, तसेच बागवानपुरा, तोफखाना, आरामशीन लाईन, तलाबकट्टा, नवामोंढा, गाडीपुरा, मारवाडी गल्ली, कोमटी गल्ली, गवळीपुरा भाग, महादेववाडी, भोईपुरा, टाले हॉल, बंजारवाडा, निरंजनबाबा चौककडील भाग, पोळा मारोती कडील भाग, भोईपुरा सदरबाजार, खडकपुरा, पेन्शनपुरा, गवळीपुरा, आदर्शनगर, मस्तानशहानगर, पलटन याही भागात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

 कंटेनमेंट झोन क्षेत्रामध्ये समाविष्ठ

याशिवाय पारधीवाडा, वडरवाडा, बस स्टॅड मागील भाग, देवडानगर, एसआरपी कॅम्प, पोलिस वसाहत, आझम कॉलनीचा भाग, बावनखोली, नगर परिषद वसाहत, शिवराजनगर, एनटीसी, नाईकनगर आदी भाग प्रतिबंधित कंटेनमेंट झोन क्षेत्रामध्ये समाविष्ठ करण्यात आला आहे.
तसेच सदर परिसराची संपूर्ण सीमाबंद करण्यात आली आहे. 

घराबाहेर फिरताना आढळून आल्यास कारवाई

या भागात कोणतेही वाहन अथवा व्यक्ती यांना आत किंवा बाहेर जाण्यास पुढील आदेशापर्यंत पूर्णत: प्रतिबंधित करण्यात येत आहे. संचारबंदी कालावधीमध्ये परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजारमध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे.

दोन दिवसांत ३८ कोरोनाबाधित

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एसआरपीएफच्या १५ संशयित रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मंगळवारी (ता. पाच) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. विशेष म्हणजे सोमवारी रात्री एसआरपीएफच्या २२ जवानांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ९१ वर पोचला आहे. यात एसआरपीएफच्या ८४ जवानांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com