esakal | हिंगोलीत भाजपने जाळल्या शेती विधेयकाला स्थगिती देणाऱ्या प्रति
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हे विधेयक लागू केले तर याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. ही स्थगित उठवण्यात यावी या मागणीसाठी अन सरकारचा निषेध म्हणून भाजच्या वतीने हिंगोली येथे बुधवार ता. सात स्थगतीच्या प्रतीची होळी केली आहे.

हिंगोलीत भाजपने जाळल्या शेती विधेयकाला स्थगिती देणाऱ्या प्रति

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : केंद्र सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेत शेती विधेयक पारित केले आहे. मात्र राज्य शासनाने त्या विधेयकाला राज्यात स्थगिती आणली आहे. हे विधेयक लागू केले तर याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. ही स्थगिती उठवण्यात यावी या मागणीसाठी अन राज्य सरकारचा निषेध म्हणून भाजच्या वतीने हिंगोली येथे बुधवार (ता. सात) स्थगितीच्या प्रतीची होळी केली आहे.

शेतकरी हा निसर्गासमोर हतबल झाला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची खरी गरज ओळखून शेतकरी विधेयक पारित केले होते. मात्र त्याला राज्यशासनाने विरोध दर्शविला आहे. त्याला स्थगिती आणल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या विधेयकामूळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विकण्यासाठी स्वातंत्र्य मिळणार होते. मात्र आता फार मोठे नुकसान होणार आहे. 

हेही वाचा किनवट : शेतकऱ्यांचे एक कोटी ७४ लाख रुपये खात्यावर होणार जमा- खा. हेमंत पाटील -

याचाच निषेध म्हणून हिंगोली येथे भाजपच्या वतीने स्थगितीच्या आदेशाच्या प्रतिची होळी करण्यात आली. अन सरकारविरुध्द घोषणाबाजी केली. हे विधेयक राज्यांमध्ये लागू करावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने रस्त्यावर आकांडतांडव करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, सरचिटणीस फुलाजी शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत सोनी, मिलिंद यंबल, तालुकाध्यक्ष संतोष टेकाळे, उमेश नागरे, बंडू कराळे, राजू पाटील, अमोल जाधव, कृष्णा रुहाटीया, रजनी पाटील, यशोदा कोरडे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

येथे क्लिक करा - नांदेड : मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनांसाठी संपर्क साधावा

हाथरसप्रकरणी रिपब्लिकन सेनेचे निदर्शने 


हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (ता. सात) हाथरसप्रकरणी पिडीतेच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली व त्या संदर्भात निवेदन देण्यात आले. 


या वेळी योगी सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा आदी मागण्या जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या. यावेळी जिल्हा नेते राहुल पुंडगे, युवा जिल्हाध्यक्ष विकी काशीदे, तसेच नितीन खिल्लारे, भारत गडधने, अविनाश कांबळे, अरुण कांबळे, लखन सरतापे आदींची उपस्थिती होती. 

संपादन - प्रल्हाद कांबळे