हिंगोलीत घंटानाद : दारूचे दुकान बंद करून मंदिरे उघडा- आमदार मुटकुळे

राजेश दारव्हेकर
Saturday, 29 August 2020

दारूची दुकाने सुरु केली असून, मंदिरे मात्र बंद असल्याने मंदिरावर उपजीविका करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला.

हिंगोली : जिल्ह्यात गेली दोन महिन्यापासून दारूची दुकाने सुरु केली असून, मंदिरे मात्र बंद असल्याने मंदिरावर उपजीविका करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी शनिवारी ता. २९ भाजपच्या घंटानाद आंदोलनात बोलताना ठाकरे सरकारवर आरोप  केला आहे.

शहरातील सराफा बाजार पेठेतील हनुमान मंदिरासमोर  शनिवारी अकरा वाजता भाजपच्या वतीने दार उघड उद्धवा दार उघड  घंटानाद आंदोलन करताना ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,फुलाजी शिंदे, नगरसेवक गणेश बांगर, बाबा घुगे, संजय ढोके, टेकाळे, उमेश नागरे,जलेश्वर मंदिराचे महंत पुरी महाराज, कालिंका मंदिराचे महंत ,यशोदा कोरडे, कृष्णा रुहाटीया ,श्याम खंडेलवाल ,यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उद्धवा दार उघड असे म्हणत ठाकरे सरकारवर  घोषणाबाजी केल्याने  परिसर दणाणून सोडला.

हेही वाचा -  नांदेड : माजी सैनिकांना ईसीएचएस मेडीकलचे कार्डस उपलब्ध -

परंतू महाराष्ट्रात आद्यप ही देऊळ बंद आहेत

कोरोना महामारीमुळे मंदिरात केवळ पूजा, अर्चा करण्यास परवानगी दिली होती, मात्र इतर वेळेस मंदिर बंद असल्याने भाविकांना दर्शनासाठी जाणे अश्यक्य झाले होते. कोरोना प्रादुर्भाव होऊन पाच महिने उलटले त्यामुळे इतर राज्यात मंदिरे भाविकांसाठी खुले करण्यात आली आहेत. परंतू महाराष्ट्रात आद्यप ही देऊळ बंद आहेत. यामुळे मंदिरावर उपजीविका करणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे  झोपलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी तसेच मंदिरे खुले करण्यासाठी हे घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे.

आज भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करून सरकारला जागे

यावेळी बोलताना मुटकुळे म्हणाले,ठाकरे सरकारने दोन महिन्यापासून दारूचे दुकाने उघडण्यास परवानगी दिली, मात्र मंदिरे उघडण्यास टाळाटाळ का केली जात असल्याचा आरोप करून हिंदू धर्मावर सरकारचा का राग आहे,हे काही कळायला मार्ग नाही. मंदिरावर उपजीविका करणारे हार, पेढे, पूजेचे साहित्य विकणारे , अशा कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर मंदिरे बंदीस्त केली आहेत. त्यामुळे शेकडो लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.दरम्यान, आधी दारूची दुकाने बंद करून मंदिरे खुली करण्यासाठी आज भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मुटकुळे यांनी सांगितले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून सोडल्याचे चित्र पाहवयास मिळत होते.

येथे क्लिक करा - हट्टा पोलिसांनी दहा लाखाच्या कंटेनरसह १८ लाखाचा गुटखा पकडला

औंढा नागनाथ येथेही आंदोलन

औंढा नागनाथः- सर्व मंदिरे व विविध धार्मिक स्थळे खुले करण्यासाठी राज्यभर घंटा आंदोलन भाजपच्या वतीने करण्यात येत असून औंढा नागनाथ येथे ही भारतीय जनता पार्टी तर्फे नागनाथ मंदिर प्रवेश द्वारासमोर घंटा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.  नागनाथ ज्योतिर्लिंगाचे मंदिर उघडा असे म्हणत घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये आघाडी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजीही करण्यात आलेली. या वेळी भाजप  किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष सुरजीतसिंह ठाकुर ,राम नागर, पांडुरंग पाटील,  शरद पाटील , डॉ. दिलीप सांगळे, बबन सोनुने  गणेश देशमुख,प्रशात स्वामी, गणेश पाटील, सर्जेराव दिंडे, सखाराम इंगळे, मुंजाजी ढोबळे, गजानन कुटे, सुनील देशमुख, सतीश सोमानी, राजू गिरी, श्रीपाद दीक्षित, दिलीप ठाकूर, विठ्ठल पाटील सह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घंटानाद आंदोलनात सहभागी होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Close liquor shops and open temples MLA Mutkule hingoli news