esakal | हिंगोली : पिक विम्यावरुन सेनगाव तालुक्यातील शेतकरीही आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यंदा अतिवृष्टिमुळे दरवर्षीपेक्षा भीषण परिस्थिती निर्माण झाली असून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून भरण्यात आलेल्यातील पिक विम्यातुन कवडीही मदत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा करण्यात आलेली नाही.

हिंगोली : पिक विम्यावरुन सेनगाव तालुक्यातील शेतकरीही आक्रमक

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : पिक विम्यावरुन शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यात सेनगाव तालुक्यातील शेतकरीसुध्दा आक्रमक झाले आहेत. हजार रुपये भरुन आठराशे रुपये आलेला धनादेश व काही न आलेल्या शेतकऱ्यांनी आठराशे रुपयांचे चेक मुख्यमंत्र्याच्या नावे पाठवले आहेत. ताकतोडा येथील चार ते पाच शेतकऱ्यांना असे धनादेश आले आहेत.

यंदा अतिवृष्टिमुळे दरवर्षीपेक्षा भीषण परिस्थिती निर्माण झाली असून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून भरण्यात आलेल्यातील पिक विम्यातुन कवडीही मदत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा करण्यात आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु आधी भरण्यात आलेल्या पिक विम्यापासून बरेच शेतकरी वंचित आहेत. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी एक हजार रुपये भरुन त्यांच्या खात्यावर केवळ आठराशे रुपये जमा करुन सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा -  हिंगोली : श्रीलंकेत होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी गोरेगावच्या ममता महाजनची निवड

तालुक्यात मुख्यमंत्र्यांनीसुध्दा शेतकऱ्यांची दिवाळी गोड करु असे आश्वासन नुकसानग्रस्तांना दिले होते. परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसुध्दा मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये राज्य व केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण होत आहे. पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये जमा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप होत आहे. केंद्र व राज्य सरकार या विमा कंपनीला पाठीशी घालत आहेत काय. असा प्रश्न सुध्दा शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये आता तालुक्यातल्या  शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्याना आठराशे व शून्य रुपयांचे चेक पाठवून सरकारचे लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट पिक विमा जमा करुन सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.

येथे क्लिक करा - हिंगोली : वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला, पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस

अडीच एकरात पिकवलेले सोयाबीन पाण्याखाली गेले आहे. एक हजार ऐंशी रुपये पिक विमा भरला. मात्र माझ्या खात्यावर आतापर्यंत एक रुपयासुध्दा जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे पिक विमा कंपनीकडून दुजाभाव केला जात आहे.
- सुभाष खोंडकर, शेतकरी ता. ताकतोडा , जिल्हा हिंगोली

संपादन-  प्रल्हाद कांबळे

loading image