Marathwada News | हिंगोली कलेक्टर ऑफिससमोर - एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli front of the collector office Attempt of self immolation

हिंगोली : कलेक्टर ऑफिससमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

हिंगोली : भारतीय मानव अधिकार संघटनचे जिल्हा अध्यक्ष मिलिद प्रधान यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार ता.२६ अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा: प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या विमानांच्या चित्तथरारक कसरती

कायद्याचा दुरुपयोग करून शासकीय महसूल बुडवून तुकडे बंदी कायद्याचा भंग केल्या प्रकरणी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना पत्र लिहून मागणी केली होती.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव रजिस्ट्री ऑफिस मध्ये तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन केले जात असून, पैशा पोटी सबरजिस्टर तळणी येथील दस्त क्रमांक २४/२२ व २५/२२ व २३/३२ ता. तीन जानेवारी तुकडे बंदी कायद्याचे भंग होणारे तीन दस्त हे मोठ्या प्रमाणावर पैशाची देवाण-घेवाण करून कोणतीही चौकशी न करता त्वरित दस्त केलेले आहेत. असे विविध मागण्या त्यांनी अर्जामध्ये नमूद करून यांनी या प्रकरणाची चौकशी करावी मागणी या पत्रामध्ये केली आहे. सोबतच चौकशी न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी ह्या पत्रामधून दिला होता. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे बुधवारी मिलिंद परदान यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ एकच खळबळ उडाली होती.

Web Title: Hingoli Front Of The Collector Office Attempt Of Self Immolation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top