Hingoli : बालकांच्या निरोगी आयुष्यासाठी आरोग्य शिबिर : पाटील

आदिवासी बहूल भाग असल्याने आरोग्य सेवा सर्वदूर आणि दुर्गम भागात पोहचलेली नाही.
hemant Patil
hemant Patilsakal

हिंगोली : जिल्ह्यात आदिवासी बहूल भाग असल्याने आरोग्य सेवा सर्वदूर आणि दुर्गम भागात पोहचलेली नाही. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य घरातील मुलांना देखील योग्यवेळी योग्य उपचार मिळावेत. त्यांचे आयुष्य निरोगी राहावे, या मुख्य उद्देशाने या आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याचे मत खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.

बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, बी. जे. वाडिया हॉस्पिटल (मुंबई) आणि राजेंद्र अग्रवाल (रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर- २०२१-२२) यांच्या संयुक्त विद्यमाने शून्य ते १८ वयोगटातील मुला- मुलींसाठी दोन दिवसीय २-डी इको तपासणी व हृदयावर मोफत शस्त्रक्रिया या शिबिराचे आयोजन शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृहात करण्यात आले आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी खासदार हेमंत पाटील मनोगत व्यक्त करताना बोलत होते.

यावेळी डॉ. श्रीपाल जैन, डॉ. शिवकुमार तडका यांच्या टीमने 2D इको तपासणी केली. शिबिरासाठी मुंबईहून आलेल्या शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रसाद सुर्यराव, गजानन नारलावार यांच्यासह प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नंदू करवा, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल करपे, सचिन बगडीया, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. बालाजी भाकरे, डॉ. फैजल खान, डॉ. सुनीता पवार, डॉ. सिद्धांत मस्के, पर्यवेक्षक लक्ष्मण गाभणे, सहायक अधिसेविका आशा क्षिरसागर, अधिपरिचारिका सुजाता कदम, शुभआशिष कामेवार, संतोष पाटील यांची उपस्थिती होती.

ज्या बालकांच्या ह्रदयाला छिद्र आहे. अशा बालकांवर मुंबईच्या बी. जे. वाडीया सारख्या मल्टी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात लवकरच उपचार केले जाणार असल्याचेही खासदार पाटील यांनी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com