esakal | हिंगोली : कोंढूर येथील 75 एकर गायरानात फिरविला जेसीबी, अतिक्रमण उद्धवस्त
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तालुक्यातील कोंढुर ग्रामपंचायत अंतर्गत गावालगत 30 हेक्टर गायरान जमिनीची नोंद आहे मात्र या भागातील जमिनीचा पोत चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती मधून चांगले उत्पन्न मिळते गावालगत असलेल्या गायरान जमिनी च्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कक्षा वाढवत गायरान जमीन हळूहळू ताब्‍यात घेण्‍यास सुरुवात केली होती

हिंगोली : कोंढूर येथील 75 एकर गायरानात फिरविला जेसीबी, अतिक्रमण उद्धवस्त

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : तालुक्यामधील कोंढुर येथील 25 ते 30 गावकऱ्यांनी मागील काही वर्षापासून गावालगत असलेल्या गायरान जमिनीवर अधिकृतपणे ताबा करून या जमिनीचा शेतीसाठी उपयोग चालविला होता मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर महसूल प्रशासनाने शुक्रवार तारीख 1 ला जवळपास पंच्याहत्तर एकर गायरान जमिनीवरील  पिकामध्ये जेसीबी यंत्र फिरवून सर्व अतिक्रमणे उद्ध्वस्त केली.

तालुक्यातील कोंढुर ग्रामपंचायत अंतर्गत गावालगत 30 हेक्टर गायरान जमिनीची नोंद आहे मात्र या भागातील जमिनीचा पोत चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती मधून चांगले उत्पन्न मिळते गावालगत असलेल्या गायरान जमिनी च्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कक्षा वाढवत गायरान जमीन हळूहळू ताब्‍यात घेण्‍यास सुरुवात केली होती. त्यानंतर मागील काही वर्षात या भागातील जवळपास गायरान जमिनीवर गावातील 25 ते 30 नागरिकांनी अनधिकृतपणे मिळेल तशी एकर दोन एकर जमिनीवर कब्जा करून या गायरान जमिनीचा शेतीसाठी उपयोग चालविला होता.

हेही वाचा डाक विभाग : ‘माझी मुलगी, माझी जबाबदारी’ योजनेची सुरुवात -

गायरान शेतीमधून उत्पन्न काढून आपले उखळ पांढरे करून घेतले

या अनाधिकृतपणे ताब्यात घेतलेल्या गायरान शेतीमधून  चांगले उत्पन्न मिळत असल्याचे पाहून अनाधिकृतपणे कब्जा केलेल्या नागरिकांनी ताब्यात घेतलेल्या शेतीला तारेचे कुंपण करून पिकांना पाणी देण्याची व्यवस्थाही करून घेतली होती या सर्व प्रकाराकडे संबंधित यंत्रणे ने दुर्लक्ष केले होते मात्र मागील काही वर्षात गायरान शेत जमिनीवर झालेल्या अतिक्रमण प्रश्नाबाबत गावात कुजबुज  सुरू झाली तरीही पुढे येऊन तक्रार कोणी करायची हा प्रश्न उभा राहिला त्यामुळे गायरान जमिनीवर अनधिकृतपणे ताबा मिळवणाऱ्या नागरिकांनी अनाधिकृत ताब्यात घेतलेल्या गायरान शेतीमधून उत्पन्न काढून आपले उखळ पांढरे करून घेतले.

धनदांडग्या लोकांनी गायरान जमिनी ताब्यात घेत तिचा शेतीसाठी उपयोग

या प्रकाराबाबत गावातील नागरिक बापूराव पतंगे यांनी महसूल प्रशासनाकडे तक्रार करून गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण काढण्याची मागणी लावून धरली होती तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी या तक्रार प्रकरणी लक्ष घालत कोंढुर येथील गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाची माहिती घेतली यामध्ये  धक्कादायक माहिती समोर आली गावातील काही धनदांडग्या लोकांनी गायरान जमिनी ताब्यात घेत तिचा शेतीसाठी उपयोग करून या जमिनी मधून उत्पन्न काढत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार श्री वाघमारे यांनी गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण दूर करण्याचा निर्णय घेतला.

येथे क्लिक करानवरात्रोत्सव सणानिमित्त मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी 

गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण उद्ध्वस्त

त्यानुसार त्यांनी गुरुवार (ता. एक )ला नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, मंडळाधिकारी आनंदराव सुळे ,तलाठी एस जी शेवाळकर, फुलचंद शिरसाठ, राजू शिरसागर, एल एन देशमुख, आर डी गिरी, पी एस चव्हाण, विनोद ठाकरे ,पीएस पाईकराव, बाळासाहेब मोरे ,यांच्यासह पथकाची नेमणूक करून गुरुवार जेसीबी यंत्र, ट्रॅक्टर इत्यादी साहित्याचा फौजफाटा सोबत घेत तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी आखाडा बाळापूर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात कोंढुर येथील जवळपास 75 एकर गायरान जमिनीवर मध्ये अतिक्रमण करून पिकवलेल्या पिकामध्ये जेसीबी यंत्र ट्रॅक्टर घालून पीक जमीनदोस्त करण्यात आली दरम्यान गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण उद्ध्वस्त केल्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी आता मोकळे झालेले गायरान मोजून घेत ताब्यात घेण्याची तयारी चालवली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top