esakal | हिंगोली : शिवाजी महाविद्यालयात 'संतांची प्रबोधन परंपरा' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

'मध्ययुगीन संतांची प्रबोधन परंपरा'  या विषयाव चर्चा करण्यात आली. माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार, संस्था अध्यक्क्षा मंदा पवार यांच्या प्रेरणेने या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

हिंगोली : शिवाजी महाविद्यालयात 'संतांची प्रबोधन परंपरा' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : शिवाजी महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र (वेबिनार) संपन्न. 

'मध्ययुगीन संतांची प्रबोधन परंपरा'  या विषयाव चर्चा करण्यात आली. माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार, संस्था अध्यक्क्षा मंदा पवार यांच्या प्रेरणेने या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक भारतीय भाषा अलिगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ अलिगड उत्तर प्रदेशातील मराठी विभागाचे डॉ.ताहेर एच. पठाण यांनी संत एकनाथाची सामाजिक प्रबोधन या विषयाच्या अनुषंगाने चर्चा केली. ते म्हणाले की, वारकरी संप्रदायाच्या इमारतीमध्ये खांबाचे म्हणजे आधाराचे कार्य एकनाथांनी केले आहे. कारण नाथाच्या कालखंडात अस्मानी- सुलतानी  संकटांनी महाराष्ट्रातील जनता त्रस्त झाली होती.

त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी संत एकनाथ यांनी प्रबोधन केले. वारकरी संप्रदायालासमोर नेण्याचे कार्य संत एकनाथ यांनी भारुड गौळण इतर अभंगातून केले आहे. समाजातील कोलाटी गारुडी बहुरूपी डोंबारी पांगुळ वासुदेव या संस्कृतीच्या लोकां संदर्भात भारुडे लिहून भारतीय सभ्यता बळकट करण्याचे कार्य केले.

खोलेश्वर महाविद्यालय आंबेजोगाई येथील डॉ. देविदास खोडेवाड यांनी संत नामदेवाचे सामाजिक प्रबोधन या विषयाच्या अनुषंगाने सखोल चर्चा केली. ते म्हणाले की, संत नामदेव बोलके सुधारक नव्हते तर ते करते सुधारक होते. त्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली म्हणून त्यांना संत शिरोमणी असे मानाचे स्थान मिळाले आहे.

यशवंत महाविद्यालय नांदेड येथील मराठी विभागप्रमुख डॉ. संगीता घुगे यांनी' स्त्री संतांचे सामाजिक प्रबोधन' या विषयावर मार्गदर्शन केले.

तेराव्या शतकातील संत मुक्ताबाईंनी ज्ञानाची सागर असलेल्या ज्ञानेश्वर याला स्वतः कमकुवत होऊ नका. समाजाच्या कल्याणासाठी तुम्हाला पुढे जायचे आहे असा उपदेश केला मुक्ताबाई जनाबाई वेणाबाई कान्होपात्रा या संत स्त्रिया समाजाला उपदेश केला. यादव कालीन स्त्रियांची विदारक अवस्था होती त्या अवस्थेतून त्यांना बाहेर काढण्याचे कार्य संत कवित्रीने केली आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोकीलाबाई गावंडे महिला महाविद्यालय दर्यापूर चे डॉ. हरिदास आखरे यांनी संत 'तुकारामाचे सामाजिक प्रबोधन' या विषयावर मार्गदर्शन केले ते म्हणाले की संत तुकारामांनी समाजातील ढोंगी प्रवृत्तीवर प्रहार केला. व्ही.यु पाटील  महाविद्यालय साक्री जिल्हा धुळे येथील डॉ.वसुमती पाटील यांनी मध्ययुगीन संत यांचे प्रबोधन आणि सद्यस्थिती या विषयावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की , श्रद्धा अंधश्रद्धा होऊ नयेत याचे भान समाजाने ठेवले पाहिजे स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांचा स्वीकार करून वैश्विक शांतता निर्माण करणे काळाची गरज आहे.

या चर्चासत्राचे आयोजक  प्राचार्य डॉ.गायकवाड बी.जी., उपप्राचार्य डॉ बाळासाहेब क्षीरसागर हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीराम कऱ्हाळे यांनी केले तर एस.एन. मुंढे यांनी  आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा. दीक्षित इंगोले, डॉ. इक्बाल जावेद, प्रा. बप्पा जाधव ,डॉ. किशोर इंगोले. डॉ. गुनाजी नलगे डॉ. सुभाष शेरकर ,डॉ. मनीषा गवळी डॉ. सुनंदा भुसारे यांनी पुढाकार घेतला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image