हिंगोली : जिल्ह्यात सर्वांच्या प्रयत्नातून कोरोनाची रुग्ण संख्या घटली

राजेश दारव्हेकर
Monday, 19 October 2020

जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून आरोग्य विभागासह सर्वच विभाग व नागरिकांनी देखील कोरोना संबंधित शासनाने दिलेल्या सुचना काटेकोर पणे  पाळणे सुरु केले आहे.

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटली असुन आता केवळ १९९ रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून आरोग्य विभागासह सर्वच विभाग व नागरिकांनी देखील कोरोना संबंधित शासनाने दिलेल्या सुचना काटेकोरपणे पाळणे सुरु केले आहे. कामानिमित्त बाजारात येणाऱ्या प्रत्येकाच्या त़ोंडाला मास्क दिसत आहे. तसेच सोशल डिस्टनचे पालन देखील होताना दिसत आहे. सार्वजनिक कार्यक्रम बंदच झाले आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे.

हेही वाचा -  नांदेड जिल्हा पुन्हा दाजी- भाऊजींच्या आरोप- प्रत्यारोपाने तापला -

एकूण २२ रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक

या सर्व गोष्टी नागरिक काटेकोर पणे पाळत  असल्याने त्याचा सर्वांना लाभ होत आहे. यासाठी आरोग्य विभागाचे मोठे योगदान आहे. कर्मचारी व कोरोना योध्दे यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे नियमित होणाऱ्या तपासणीत रुग्णांची संख्या घटली आहे. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी १८  रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोरोनाच्या चार रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण २२ रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आज घडीला जिल्ह्यात एकूण १९९ रुग्णांवर उपचार सुरु

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण दोन हजार ९५७ रुग्ण झाले असून, त्यापैकी दोन हजार ७२२  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण १९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनिमुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४७  व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

येथे क्लिक करा - नांदेड : डोळ्याला भुरळ घालणाऱ्या ‘गुलतुर वृक्षां’ च्या फुलांची उधळण -

नऊ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत

दरम्यान, रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे वसमत परिसरात एक व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे कळमनुरी परिसर सहा व्यक्ती व वसमत परिसरात दोन व्यक्ती असे एकूण नऊ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर सहा  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे श्री. सुर्यवंशी यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: The number of corona patients in the district has come down due to the efforts of all hingoli news