Hingoli : मुंबईतील मेळाव्याला जाण्यासाठी शिंदे गटाची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी
Hingoli
Hingolisakal

हिंगोली : मुंबई येथील दसरा मेळाव्यास जाण्यासाठी शिंदे गटाची पूर्वतयारी बैठक शनिवारी (ता. १) शहरातील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी जिल्ह्यातून तब्बल दोनशे बसने शिवसैनिक मुंबईला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी आ. बांगर म्हणाले की, पूर्वी सर्वसामान्य जनतेची इच्छा होती की, शिवसेना व बीजेपीचे सरकार स्थापन व्हावे. परंतु,जनतेचा विश्वासघात करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेच्या इच्छा पूर्ण केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांना सहभागी होण्यासाठी जायचे आहे. यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे, असे आवाहन यावेळी आमदार बांगर यांनी उपस्थितांना केले.

विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहा ः पाटील

हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी दसरा मेळाव्यानिमित्त मुंबई येथे जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. खासदार हेमंत पाटील म्हणाले की, एखाद्या पक्षात तीस- पस्तीस वर्षे राहून देखील शिवसैनिक म्हणून हवा तसा माण मिळत नव्हता. परंतु, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून सर्व राज्याचे पालक म्हणून दिवस रात्र विकास कामे केली जात आहेत. त्यामुळेच हिंगोली जिल्ह्यात अनेक विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.

येत्या काळात प्रत्येक गावात किमान एक तरी विकास कामाचे भूमिपूजन व्हावे. असे नियोजन करण्यात येत आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर होणारा यंदाचा दसरा हा प्रत्येक शिवसैनिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून, हिंगोली येथून २०० बस तर नांदेड येथील १८ कोच असलेली रेल्वे बुकिंग करण्यात आली आहे, असेही खासदार पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com