esakal | मनातला मोर, उभा राहतोय समोर...
sakal

बोलून बातमी शोधा

टेंभुर्णी : गव्हाच्या काड्यांपासून मोराची मनोहारी कलाकृती साकारताना जगदीश शर्मा. 

 टेंभुर्णी येथील जगदीश शर्मा या अवलिया कलाकाराने हा मनातला मोर मुक्त केला आहे, म्हणूनच कधी बांगड्यांच्या काचेतून, कधी गव्हाच्या काड्यांमधून तो प्रकट होतो. अर्थात या कलाकृती तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत कदाचित; कारण त्या पूर्ण झाल्या की कुणाला तरी भेटस्वरूपात मिळालेल्या असतील. 

मनातला मोर, उभा राहतोय समोर...

sakal_logo
By
संजय राऊत

टेंभुर्णी (जि.जालना) -  प्रत्येकाच्या मनात एक मोर असतो; पण त्याला बाहेर येता येईलच असे नाही. टेंभुर्णी येथील जगदीश शर्मा या अवलिया कलाकाराने हा मनातला मोर मुक्त केला आहे, म्हणूनच कधी बांगड्यांच्या काचेतून, कधी गव्हाच्या काड्यांमधून तो प्रकट होतो. अर्थात या कलाकृती तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत कदाचित; कारण त्या पूर्ण झाल्या की कुणाला तरी भेटस्वरूपात मिळालेल्या असतील. 

आई-वडील गेल्यानंतर ५० वर्षीय जगदीश शर्मा यांचा जीवनाचा मोठा आधारच गेला. त्यातच दोनाचे चार हातही झालेले नाहीत. अशावेळी बाह्यजीवनात एकटेपणा आलेला असला तरी मनात असंख्य मोर साथ देऊन आहेत. म्हणून तर विविध प्रकारच्या कलाकृतींच्या निर्मितीने त्यांच्या आयुष्याला एकप्रकारे संपन्नही केलेले आहे.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

कधी फुटलेल्या बांगड्यांच्या काचा घेऊन, कधी गव्हाच्या काड्या एकत्र करून मूर्त, अमूर्त असा विविध कलाकृती बनविण्याचा छंदही त्यांनी जोपासला. विशेष म्हणजे या तयार केलेल्या चित्रांची, कलाकृतींची ते विक्री करत नाहीत, तर कुणालाही भेट म्हणून देऊन टाकतात.

हेही वाचा : दीड वर्षाच्या चिमुकलीला घरी ठेवत ‘त्या’ कर्तव्यावर

आता राहिला प्रश्‍न पोटापाण्याचा, तर ते दुकानांची राखणदारी करतात, परिसरातील यात्रांच्या काळात दुकानासमोर, गणेशोत्सवात दहा दिवस मंडळासमोर, नवरात्रोत्सवात देवीच्या मंडळात हातात काठी घेऊन त्यांच्यातील एक सुरक्षारक्षक जागा असतो. कमी गरजांमुळे मिळालेल्या तुटपुंज्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.