Honesty of the farmer : बळीराजा असतोच प्रामाणिक! गहाळ झालेले पॉकेट दोन तासांत मिळाले परत

Farmer
Farmer

सोयगाव : एसटीच्या कर्मचाऱ्याचे हरविलेलं पॉकेट इमानदार शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच अवघ्या दोनच तासात हरविलेलं पॉकेट एसटीच्या कर्मचाऱ्याला शेतकऱ्याने परत केल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली आहे.

Farmer
Uniform Civil Code: समान नागरी कायद्याला पाठिंबा पण...; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला दाखवला आरसा

सोयगाव परिवहन आगाराचे सहायक लिपिक राहुल नागरगोजे यांचे मंगळवारी अकरा वाजता खिशातील पॉकेट त्यात दोन हजार पाचशे रु रोकड व नोकरीची महत्वाचे कागदपत्रे असलेले पॉकेट हरविले पण तेच पॉकेट सोयगावातील एका ३२ वर्षीय राजेंद्र बोडखे यांना शहराच्या शिवाजी चौकात आढळून आले. त्यांनी या मिळालेल्या पॉकेटचा तपास घेत त्यांचे मित्र दत्ता गाडेकर यांच्या मदतीने पॉकेट मालकाचा शोध घेऊन त्यांना पॉकेट परत केले.

Farmer
Ajit Pawar : चाळीस आमदारांना खूष करायला वाट्टेल ते सुरु आहे

यामुळे या शेतकऱ्याच्या इमानदारीचे शहरात कौतुक होत आहे. दरम्यान सापडलेल्या पॉकेटचा खरा मालक शोधण्यात यश आल्यावर ते पॉकेट वाहतूक नियंत्रक सुरेश घोडेस्वार, दत्ता गाडेकर, नाना वानखेडे,गोपाल डोंगरे, योगेश बोखारे यांच्या हस्ते परत करण्यात आले.

दरम्यान नोकरीच्या संदर्भात महत्वाची कागदपत्रे असलेले पॉकेट परत मिळाल्याने एस टी कर्मचारी राहुल नांगरगोजे यांनी सुटकेचा श्वास सोडला मात्र राजेंद्र बोडखे या इमानदार शेतकऱ्याचे शहर भर कौतुक करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com