esakal | मी तिला जाळून मारतोय, तर तुम्ही कशाला विझवता असे म्हणत...
sakal

बोलून बातमी शोधा

latur news

मी तुला जीवंत सोडत नाही, तू माझ्या काही कामाची नाहीस, म्हणून हातातील काढीपेटी पेटवून वर्षाच्या अंगावर टाकली. साडीने पेट घेतला असता तिच्या आईवडिलांनी विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिच्या आई वडिलांनाही आग का विझवता म्हणून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली.

मी तिला जाळून मारतोय, तर तुम्ही कशाला विझवता असे म्हणत...

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर : पत्नीला जिवंत जाळून जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणाऱ्या पतीस दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी (ता.5) येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे.

वर्षा बालाजी ढगे हिचा विवाह बालाजी उध्दव ढगे (रा.डिग्रस) ता.उदगीर याच्याशी 21 एप्रिल 2008 रोजी झाला होता. मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून वर्षा हिला सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळाला सुरुवात केली. मी दुसरे लग्न करून घेतो, तू माहेरी निघून जा म्हणून त्रास दिला जात होता. ती माहेरी जाऊन महिला समुपदेश केंद्राकडे रीतसर अर्ज केला. त्या दोघांत समुपदेश केंद्रात तडजोड झाली.

तडजोडी प्रमाणे सासरच्या लोकांनी तिला घेउन गेले नाहीत. म्हणून तिने स्वतःहून आई-वडिलांसह नवऱ्याकडे गेली. त्यावेळी घरी सासु, सासरे होते. त्यांनी वर्षाला पाहताच तू परत काआलीस? आमचा मुलगा बालाजी याचे दुसरे लग्न करून देणार आहोत म्हणुन वर्षा व तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ केली. वर्षाचा आवाज ऐकून नवरा बालाजी याने घरातील रॉकेल पाण्याच्या बाटलीमध्ये आणून वर्षाच्या अंगावर ओतले.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

मी तुला जीवंत सोडत नाही, तू माझ्या काही कामाची नाहीस, म्हणून हातातील काढीपेटी पेटवून वर्षाच्या अंगावर टाकली. साडीने पेट घेतला असता तिच्या आईवडिलांनी विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिच्या आई वडिलांनाही आग का विझवता म्हणून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. वर्षाला तिच्या भावाने उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला. अशा आशयाची फिर्याद ग्रामीण पोलीस ठाण्यात 17 डिसेंबर 2015 मध्ये दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणाची कोर्टात रितसर सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र.2)  यांच्या न्यायालयात न्यायाधीश श्री मणेर यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन आरोपी बालाजी याचा जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार  व वैद्यकीय अभिप्राय, मुद्देमाल  याआधारे सिद्ध झाल्यावरून बालाजीस दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावली तर बालाजीच्या आई-वडिलांची निर्दोष मुक्तता केली. फिर्यादीच्या बाजूने सरकारी वकील अॅड.बिरादार यांनी काम पाहिले.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

loading image