esakal | हुश्श... ऽऽऽ ‘त्या’ १२ जणांचे ‘स्वॅब’ निगेटीव्ह

बोलून बातमी शोधा

File Photo

इंडोनेशियाहून आलेले दहा संशयित आणि दिल्लीहून आलेले दोन अशा एकुण १२ संशयितांचे स्वॅब रिपोर्ट औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. रविवारी (ता.सहा) या सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्यामुळे नांदेडकरांनी सुटकेचा निश्‍वास सोडला

हुश्श... ऽऽऽ ‘त्या’ १२ जणांचे ‘स्वॅब’ निगेटीव्ह
sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : नांदेड जिल्ह्यात दररोज कोरोना संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. रविवारी (ता. पाच) इंडोनेशियाहून आलेले दहा संशयित आणि दिल्लीहून आलेले दोन अशा एकुण १२ संशयितांचे स्वॅब रिपोर्ट औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. रविवारी (ता.सहा) या सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्यामुळे नांदेडकरांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. 

काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाहून नांदेड शहरात दाखल झालेल्या दहा व दिल्लीहून आलेल्या दोन अशा एकुण १२ संशयित व्यक्तींना नांदेड पोलिस विभागाने शोधून आणलेल्या त्या सर्वांचे स्वॅब रविवारी (ता. पाच) औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. इंडोनेशियाहून परतलेले ते दहा संशयित सध्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल असून यापूर्वी रुग्णालयात तीन संशयीत दाखल आहेत. तर दुसरीकडे शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये पाच जणांना ठेवण्यात आले आहे. या पूर्वीच या पाच जणांचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. सोमवारी पुन्हा १४ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

हेही वाचा- सफाईवाल्या हातांना पेढे वाटुन सलाम

प्रशासकीय यंत्रणेला झटका 
कोरोना व्हायरसचे नाव ऐकला सुद्धा नको वाटते. इतकी लोकाच्या मनात कोरोनाची भीती बसली आहे. आजच्या आठ दिवसापूर्वी महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पन्नासच्या आत होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसापासून ‘कोरोना’ बाधित रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. दोन दिवसापूर्वी नजिकच्या हिंगोली जिल्ह्यात एकही कोरोना संक्रमित रुग्ण आढळुन आला नव्हता. मात्र अचानक एकाच दिवशी चार रुग्ण आढळले तर दुसरीकडे लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी आठ रुग्ण आढळून आल्याने दिवसरात्र एक करुन पहारा लोकासाठी रस्त्यावर असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला आणि तेथील नागरीकांना जणू झटकाच बसला आहे.

हेही वाचले पाहिजे- माहूरला बुद्ध लेणी म्हणूनच झाली होती सुरुवात : अतुल भोसेकर
रिपोर्ट निगेटीव्ह यावा म्हणून जणू देव पाण्यात 

काही दिवसापूर्वी इंडोनेशियाहून आलेले दहा नागरीक व दिल्लीच्या तबलीगहून परत आलेले नागरीक नांदेडात लपून बसल्याचे समजताच सतर्क असलेल्या पोलीस यंत्रणेनी त्यांना शोधून विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात स्वॅब तपासणी साठी पाठविले होते. तेव्हापासून अनेकांनी त्यांच्या रिपोर्ट प्राप्त होईपर्यंत ते बाराजण कोरोना बाधित तर नाहीत ना किंवा त्यांच्यामुळे नांदेड शहर धोक्यात तर येणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न जिल्हा प्रशासन आणि नांदेडकरांच्या मनात घर करत होते. अनेकांनी त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह यावा यासाठी जणू देव पाण्यात ठेवले होते. त्या सर्वांचा रिपोर्ट अखेर निगेटीव्ह आला आणि सर्व यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.