esakal | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! रोपवाटिका सुरू करा, असा करा अर्ज  
sakal

बोलून बातमी शोधा

RopWatika.jpg

इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेत अर्ज करण्यासाठी Maha DBT (https://mahadbtmahait.gov.in/) या संकेतस्थळावर ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे ता.२ नोव्हेंबरपर्यंत करावेत.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! रोपवाटिका सुरू करा, असा करा अर्ज  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


वर्ष २०२०-२१ मध्ये भाजीपाला पिकाची दर्जेदार व किडरोगमुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे तसेच रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे, पीक रचनेत बदल घडवून आणणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेत अर्ज करण्यासाठी Maha DBT (https://mahadbtmahait.gov.in/) या संकेतस्थळावर ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे ता.२ नोव्हेंबरपर्यंत करावेत. अर्जासोबत सात बारा, ८ अ, स्थळदर्शक नकाशा, चतु:सीमा, संवर्ग प्रमाणपत्र, कृषी पदवी बाबतचे कागदपत्रे, महिला शेतकरी गट असल्यास त्याचे नोंदणी पत्र, आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्स प्रत जोडावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)