esakal | हिंगोलीत खताची मागणी ९० हजाराची! मिळाले ६६ हजार मेट्रिक टन
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोलीत खताची मागणी ९० हजाराची! मिळाले ६६ हजार मेट्रिक टन

कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

हिंगोलीत खताची मागणी ९० हजाराची! मिळाले ६६ हजार मेट्रिक टन

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : खरीप हंगामासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्यासाठी खत कंपन्यांकडे व आयुक्त कार्यालयाकडे ९० हजार ५२ मेट्रिक टॅन खताची मागणी केल्यानंतर आता पर्यंत ६६ हजार ८९९ मेट्रिक टन खत मिळाले आहे. (in hingoli, the agriculture development officer has demanded fertilizer)

हेही वाचा: महावितरण समोर थकीत बील वसुलीचे आव्हान! परभणी जिल्ह्यातील स्थिती

दरम्यान ,मृगनक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे. तर काही भागात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे सोयाबीन पेरणी सोबत खत देखील टाकत असल्याने खताचा तुटवडा शेतकऱ्यांना पडू नये, यासाठी कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

हेही वाचा: हिंगोली नगरपरिषदेच्या नवीन तीन प्रकल्पास शासनाची मंजूरी

त्यासाठी कृषी विकास अधिकारी यांनी युरिया खताची २० हजार २०९ टन मागणी केली आहे. डीएपी ९ हजार ५२६ ,एमओपी ३००९, एसएसपी ४००६, एनपिके ५३ हजार ३०२ खताची मागणी केली आहे. त्याप्रमाणे आयुक्तालयाकडून आतापर्यंत युरिया १७ हजार ३८ मेट्रिक टन, डीएपी १७हजार ३५१ मेट्रिक टन, एमओपी पाच हजार६४१ मेट्रिक टन, एसएसपी १२ हजार ५८१ मेट्रिक टन, एनपिके २० हजार १५१ मेट्रिक टन असा एकूण मिळून ७३ हजार १०५ मेट्रिक टन खत उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा: हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात; क्षेत्र वाढले

मे अखेर २२ हजार ४८० मेट्रिक टन मंजूर झालेले खत मिळाले आहे. त्यानंतर ३६ हजार ७३४ मेट्रिक टन खताचा पुरवठा एक एप्रिल पासून ते खरीप हंगामासाठी करण्यात आला. ३१ मार्च अखेर ३० हजार व १६५ मेट्रिक टन खत शिल्लक साठा आहे. तर आतापर्यंत ३६ हजार १८८ मेट्रिक टन खताची विक्री झाली असून ३० हजार ७८१ मेट्रिक टन खत शिल्लक असल्याचे कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे यांनी सांगितले. तसेच मंगळवारी (ता.१५) १५०० मेट्रिक टॅन खताची गाडी आली असून गाड्या लोड होण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा: हिंगोली ब्रेकींग : खड्ड्यात कार कोसळून चार शिक्षक ठार; सेनगांवजवळ अपघात

खताचा तुटवडा भासणार नाही, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी खरीप हंगामात खताचा तुटवडा भासणार नसून मागणी केल्यानुसार खताचा साठा कृषी विक्रेत्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. येत्या तीन दिवसात आणखी दुसरी रॅक येणार आहे.

- निलेश कानवडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली

(in hingoli, the agriculture development officer has demanded fertilizer)

loading image