महावितरण समोर थकीत बील वसुलीचे आव्हान! परभणी जिल्ह्यातील स्थिती

महावितरण समोर थकीत बील वसुलीचे आव्हान! परभणी जिल्ह्यातील स्थिती

Summary

परभणी जिल्ह्याचे अर्थचक्रच बंद पडल्याने महावितरणच्या थकबाकीच्या रक्कमेतही मोठी वाढ दिसून आली आहे.

परभणी : एकीकडे कोरोना (Corona) विषाणू संसर्गाने संपूर्ण अर्थचक्र बंद पडलेले असताना दुसरीकडे महावितरणसमोर (MSEDCL) परभणी जिल्ह्यातील थकीत बील वसुलीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यात घरगुती, व्यापारी, व्यवसायिक, शेतीपंप, पाणीपुरवठा, पथदिवे, सार्वजनिक सेवांकडे तब्बल १९३९.१३ कोटी रुपयांची थकबाकी (Arrears) झाली आहे. यावर्षात या थकबाकीतील केवळ १५६.६७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. (The arrears of MSEDCL in Parbhani district have increased significantly)

महावितरण समोर थकीत बील वसुलीचे आव्हान! परभणी जिल्ह्यातील स्थिती
परभणी ब्रेकींग : भाकप कार्यकर्त्यांकडून नरेंद्र मोदींच्या पुतळ्याचे दहन

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. प्रदिर्घ काळ बाजारपेठ बंद राहिल्याने याचा विपरित परिणाम जिल्ह्याच्या अर्थचक्रावर दिसून आला आहे. जिल्ह्याचे अर्थचक्रच बंद पडल्याने महावितरणच्या थकबाकीच्या रक्कमेतही मोठी वाढ दिसून आली आहे. मध्यतंरी राज्य सरकारने वीज बिल वसुली थांबवावी, असे निर्देश दिल्याने कोरोना काळातील वीज बिलांची थकबाकी वसुली महावितरण कडून थांबविण्यात आली होती.

महावितरण समोर थकीत बील वसुलीचे आव्हान! परभणी जिल्ह्यातील स्थिती
परभणी : गावकऱ्यांच्या वतीने मोरेगाव येथे २० खाटांचे मोफत कोरोना सेंटर

परंतु आता परत अनलॉक होवून व्यवहार सुरळीत सुरु झाल्याने महावितरणची पथके वसुलीसाठी बाहेर पडली आहेत. घरोघरी भेट देवून वसुलीसाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतू जिल्ह्यातून वसुलीस प्रतिसाद मिळत नसल्याने वसुली नगण्य दिसत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी ही शेतीपंपाची आहे. तसेच शेतीपंपाची वसुलीही सर्वात कमी आहे. त्यामुळे व्यापारी, घरगुती किंवा व्यवसायाची वीज बिल वसुली करण्यापेक्षा शेतीपंपाच्या वसुलीस महावितरणला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.

महावितरण समोर थकीत बील वसुलीचे आव्हान! परभणी जिल्ह्यातील स्थिती
परभणी : लसीकरणाची पुरवठ्याअभावी कासवगतीने वाटचाल

कृषीपंप वीज धोरणांचा फायदा

जिल्ह्यात कृषीपंप वीज धोरण २०२० नुसार जिल्ह्यातील ९६ हजार ७९४ कृषीपंप ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे सप्टेंबर २०२० अखेर १३८५.६२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. असे असतानाही महावितरणकडून या धोरणानुसार मार्च २०२२ पुर्वी शेतीपंप वीज देयक भरल्यास ९७९.७४ कोटी रुपयांची सूट देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ५० टक्केनुसार सुटीचा लाभ घेतल्यास कृषीपंप ग्राहकांना ४०५.८८ कोटी रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे.

महावितरण समोर थकीत बील वसुलीचे आव्हान! परभणी जिल्ह्यातील स्थिती
परभणी जिल्ह्यात एक लाख 65 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण : पालकमंत्री नवाब मलिक

अशी आहे वीज बिलाची स्थिती (३१ मे २०२१ अखेर)

जिल्ह्यात घरगुती, व्यापारी, व्यवसायिक ग्राहकांकडे ३३१.५७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी १३६.७६ कोटीची वसुली झाली आहे. शेतीपंपांची १४६१.२८ कोटी थकबाकी आहे, त्यापैकी १०.५८ कोटीची वसुली झाली आहे. पाणीपुरवठा, पथदिवे, सार्वजनिक सेवांकडे १४६.२८ कोटीची थकबाकी आहे. त्यापैकी ९.३३ कोटीची थकबाकी आहे.

महावितरण समोर थकीत बील वसुलीचे आव्हान! परभणी जिल्ह्यातील स्थिती
परभणी शहरात 'आरटीपीसीआर' टेस्टमुळे अनेकांची लसीकरणाकडे पाठ

सध्या वीज बिल वसुलीसाठी महावितरण कडून नियमित वसुली पथके पाठविण्यात आली आहेत. त्यांच्याद्वारे कोणतीही सक्ती न करता वसुली केली जात आहे. वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे हि विनंती.

- प्रवीण अन्नछत्रे, अधिक्षक अभियंता, परभणी

(The arrears of MSEDCL in Parbhani district have increased significantly)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com