जिंतूर (परभणी) : शेतकरी विरोधी कायद्याच्या व महागाईच्या निषेधार्थ कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता.१९) दुपारी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा १९ जून रोजीचा वाढदिवस पक्षातर्फे संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शेतकरी विरोधी कायद्याचा,पेट्रोल,डिझेल, घरगुती वापरासाठीच्या गॅसची दरवाढ तथापि एकूणच महागाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशाहीन नेतृत्वामुळे देश अभुतपुर्व संकटाचा सामना करीत असून कोरोनामुळे देशाची मोठी हानी होऊ शकते, असा इशारा देत वेळीच उपाययोजना करण्याच्या सुचना खासदार राहुल गांधी यांनी सरकारला करूनही हा जवाबदारीचा सल्ला न ऐकता देशाला हेकेखोरपणाने मरणाच्या खाईत लोटण्याचे काम देशातील मोदी सरकारने केले आहे. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नागसेन भेरजे यांनी केला.
नागसेन भेरजे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात परभणी जिल्हा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रदिप देशमुख,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राम देशमुख, शहराध्यक्ष सुलेमान सिद्दीकी, ज्ञानेश्र्वर राठोड, सुरज कनकुटे,पिंकल खंदारे, राज कनकुटे,ध्रुपत गायकवाड, दिपक ढगे व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.