
उदगीरमध्ये १८० धार्मिकस्थळांनी घेतली भोंगा वाजवण्याची परवानगी
उदगीर (जि.लातूर ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुरू केलेल्या अनधिकृत भोंग्याविरुद्ध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उदगीर (Udgir) शहरातील ५६ धार्मिक स्थळांनी तर ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील १२४ धार्मिक स्थळांनी भोंगा वाजवण्याची अधिकृत परवानगी घेतल्याची माहिती शहर पोलिस निरीक्षक गोरख दिवे व डीएसबी शाखेचे जमादार शिवाजी केंद्रे यांनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन पिंगळे यांच्या अहवानानुसार शहर पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांनी उदगीर शहरातील धार्मिकस्थळांना न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यक असलेली परवानगी घेऊन त्याचे पालन करावे, अशा सूचना केल्या होत्या. (In Udgir 180 Religious Places Take Loudspeakers Permission)
हेही वाचा: Nanded|फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला टिप्परने उडवलं, उपचार सुरु असताना मृत्यू
याला प्रतिसाद देत शहरातील मशिद, दर्गा, मंदिर चर्च बुद्धविहार व मदरसे अशा एकूण ५६ धार्मिकस्थळांच्या विश्वस्तांनी अधिकृत शहर पोलिस ठाण्यात अर्ज देऊन रितसर परवानगी घेतल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक दिवे व विभागाचे जमादार संतोष दुबळगुंडे यांनी दिली आहे. पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीतील गावागावात धार्मिकस्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्यासंदर्भात पोलीस प्रशासनाच्या अहवानानुसार ५४ मशिद, ६७ मंदिर, तीन बौद्धविहार यांना भोंग्यासंदर्भात अधिकृत परवानगी देण्यात आल्याची माहिती डीएसबी शाखेचे जमादार श्री केंद्रे यांनी दिली आहे.
हेही वाचा: Pfizer | फायझरने भारतात आशियातील सर्वात मोठे 'औषध विकास केंद्र' केले सुरु
नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही धार्मिक स्थळाचे भोंगे वाजणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय परवानगी पत्रात नमूद केलेल्या क्षमते इतकाच भोंग्याचा आवाज असला पाहिजे. त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई अटळ असल्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे यावेळी शहर पोलीस निरीक्षक श्री दिवे यांनी सांगितले.
Web Title: In Udgir 180 Religious Places Take Loudspeakers Permission
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..