निष्क्रिय मराठा आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

हरी तुगावकर
गुरुवार, 26 जुलै 2018

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे राहिले आहे. राज्यात मराठा समाजातील आमदारांची संख्या लक्षणीय आहे. तरीदेखील ते आवाज उठवत नाहीत. त्यामुळे आंदोलनकर्त्यात त्यांच्याविषयी असंतोष पसरत चालला आहे.

लातूर : राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन सुरु असताना राज्यातील मराठा समाजाचे आमदार मात्र गप्प आहेत. त्यामुळे आंदोलनकर्त्यात त्यांच्याविषयी असंतोष पसरला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येथील मराठा क्रांती भवनच्या समोरच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यातील निष्क्रिय मराठा आमदारांच्या प्रतिकात्मक
पुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निषेधही करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे राहिले आहे. राज्यात मराठा समाजातील आमदारांची संख्या लक्षणीय आहे. तरीदेखील ते आवाज उठवत नाहीत. त्यामुळे आंदोलनकर्त्यात त्यांच्याविषयी असंतोष पसरत चालला आहे. ठिकठिकाणी त्यांचे निषेधही होऊ लागले आहेत. जिल्ह्यात सध्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरु आहे.

गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येथील अशोक हॉटेल परिसरात असलेल्या मराठा क्रांती भवन कार्यालयासमोर आंदोलनकर्ते एकत्र आले. त्यांनी राज्यातील निष्क्रिय मराठा आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यांचा निषेधही नोंदविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निषेध व्यक्त केला. 'जय जिजाऊ, जय शिवराय', 'एक मिशन, मराठा आरक्षण', 'देवेंद्र फडणवीस यांचा धिक्कार असो' अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

Web Title: inactive Maratha MLA Statue Burn