मंदिरे खुली करा, कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारासमोर साधु-संतांचा एल्गार!   

जगदीश कुलकर्णी
Thursday, 5 November 2020

तूळजापूर : महाराष्ट्र आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने मंदिर खुले करण्यासाठी तूळजापूर येथे कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरासमोर आंदोलन. देवीचा जागर करीत आंदोलनाला सुरुवात

औरंगाबाद : एक नोव्हेंबर पर्यंत मंदिरे उघडण्याच्या मागणीला राज्य सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही, त्यामुऴे आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे गुरुवारी ता.५ श्रीक्षेत्र तुळजापूर येथे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मंदिरे उघडण्यास सरकार परवानगी जो पर्यंत परवानगी देत नाही. तो पर्यंत साधु संताचा एल्गार सुरूच राहणार आहे, असे आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले. या आंदोलनप्रसंगी विविध ठिकाणचे संत महात्मे व भाविकांचा सहभाग होता.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! 

राज्यपाल महोदयांना भेटून आध्यात्मिक समन्वय आघाडीने राज्य सरकारकडे १ नोव्हेंबर पर्यंत मंदिरे उघडा अशी मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तसेच साधु- संतांच्या शिष्टमंडळाशी चर्चा देखील केली नाही. राज्यातील भाविक जनतेच्या भावनांपेक्षा ठाकरे सरकारला आपला अहंकार जपायचा आहे. त्यामुळे आता राज्यातील भाविक जनता मंदिरांवर लावलेले अन्याय आणि अहंकाराचे टाळे तोडून मंदिरे उघडणे सुरु करणार आहे. परंतु, सर्वच मोठी देवस्थाने की ज्यांच्यावर लाखो कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे, अशी देवस्थाने राज्य सरकारच्या अधिपत्याखाली आहेत. त्याठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेऊन देव-भक्तांच्या आड येण्याचे पाप हे हिरण्यकश्यिपू राज्य सरकार करत आहे. असेही आंदोलन कर्त्यांनी म्हटले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या विरोधात आध्यात्मिक समन्वय आघाडी गुरुवारी (ता.५) श्रीक्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. जो पर्यंत मंदिर खुले करीत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असा पवित्रा घेण्यात आला आहे. यांच्यासह प्रमुख साधु, संत, धर्माचार्य आंदोलनात सहभागी झाले आहेत.  करतील. या आंदोलनात सर्व धार्मिक-आध्यात्मिक संघटना, स्थानिक व्यावसायिक, तसेच सर्व राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी यांचाही सहभाग आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indefinite agitation saints demanding opening temples Tuljapur news