उद्योगांनी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, पालकमंत्री देशमुखांचे आदेश

2amit_deshmukh_1
2amit_deshmukh_1

लातूर : जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुरळीतपणे चालू राहण्यासाठी उद्योग सुरू झाले पाहिजेत. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार जेवढे उद्योग सुरू करता येतील तेवढे उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी; परंतु या उद्योगांनी कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी प्रशासनाने दिलेले मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. सध्या काही उद्योग सुरू आहेत. यात सामाजिक अंतर न पाळणारे उद्योग तातडीने बंद करावेत, असे आदेश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

येथे मंगळवारी (ता.२१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

अशा आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये उद्योगांनी पुन्हा उभारी घेण्यासाठी शासन-प्रशासनाने सहकार्य करावे. त्यातून जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही पुन्हा सुरू होणार आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उद्योगाच्या ठिकाणी कामगारांनी सामाजिक अंतर पाळले पाहिजे. अन्यथा असे उद्योग तत्काळ बंद करावेत. त्यासाठी एमआयडीसीने एक पथक तयार करावे अशी सूचनाही श्री.देशमुख यांनी केली. उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून रुग्ण लातूरकडे पाठविले जाऊ नयेत.

अत्यावश्यक असेल तरच रेफर करावे. अन्यथा सर्व सुविधा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असल्याने डॉक्टरांनी येथेच रुग्णांची तपासणी करण्याची सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी केली. लातूर जिल्ह्याला २२ व्हेंटिलेटर मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिली. तसेच विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील लॅब ही शुक्रवारपर्यंत (ता.२४) कार्यान्वित होईल, असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com