मोदींच्या काळात भ्रष्टाचाराची पद्धत बदलली - प्रकाश आंबेडकर

हरी तुगावकर
सोमवार, 2 जुलै 2018

लातूर - काँग्रेसच्या काळात मंत्री भ्रष्टाचार करीत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार करण्याची पद्धत बदलली आहे. मंत्र्याऐवजी कार्पोरेट करप्शन ही संकल्पना पुढे आली. यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. भारतीय जनता पक्षाला कोणत्या कार्पोरेट कंपन्यांनी किती निधी दिला याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (ता.२) पत्रकार परिषदेत केली.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार नाही. स्वतंत्र निवडणूक लढवली जाईल. तर लोकसभेत मात्र आघाडीसोबत असेन असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संरक्षण विभागासाठी विमान खरेदीचा विषय सध्या ऐरणीवर आहे. यात शंभर विमाने तयार केली जाणार आहेत. एचएएल ही सरकारी कंपनी आहे. त्यांच्याकडे विमान तयार करण्याची क्षमता आहे. असे असताना विमान तयार करण्याचे काम रिलायन्स कंपनीला का देण्यात आले. याचा खुलासा श्री. मोदी यांनी करावा,  अशी मागणीही श्री. आंबेडकर यांनी यावेळी केली.

काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्रीच खात होते. तेच भ्रष्टाचार करीत होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात मंत्री खात नाहीत पण कार्पोरेट करप्शन मात्र वाढत चालले आहे. मंत्र्यांनी खाल्ले तर सिस्टीम खराब होत नाही. पण कार्पोरेट करप्शन झाले तर पूर्ण सिस्टिमच खराब होते. या कंपन्यांचे ऑडिटच होत नाही. मोदींच्या काळात कार्पोरेट कंपन्यांना कामे देवून त्यांच्याकडून भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात निधी घेतला जात आहे. या पक्षाला कोणत्या कंपनीने किती निधी दिला व त्या बदल्यात सरकारने त्या कंपन्यांना कोणत्या सवलती दिल्या याची चौकशी निवडणूक आयोगाने करावी अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

विधानसभेच्या निवडणुकीत लहान लहान समाजाला एकत्र करून निवडणूक लढविण्यात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही. स्वतंत्र निवडणूक लढविण्यात येणार आहे. पण भाजपाच्या काळात संविधानच धोक्यात येत आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीसोबत जाणार असल्याचे श्री. आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Investigate BJP's corporate fund - Prakash Ambedkar