esakal | ताई काळजी घे, मी तुझ्यासोबत आहे; आयसोलेटेड झालेल्या पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेचा दिलासा   
sakal

बोलून बातमी शोधा

dhanu-pankaja.jpg

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आजारी असल्याचं समजल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरुन त्यांची विचारपूस केली. 'ताई तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे' अशा शब्दात त्यांनी पंकजा यांना दिलासा दिला असून याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. सर्दी, खोकला आणि ताप असल्यामुळे पंकजा मुंडे सद्या आयसोलेट झाल्या आहेत. मात्र, कायम राजकीय विरोधक असलेल्या बहिण-भावाचा स्नेह पुन्हा दिसून आला आहे. 

ताई काळजी घे, मी तुझ्यासोबत आहे; आयसोलेटेड झालेल्या पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेचा दिलासा   

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आजारी असल्याचं समजल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरुन त्यांची विचारपूस केली. 'ताई तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे' अशा शब्दात त्यांनी पंकजा यांना दिलासा दिला असून याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. सर्दी, खोकला आणि ताप असल्यामुळे पंकजा मुंडे सद्या आयसोलेट झाल्या आहेत. मात्र, कायम राजकीय विरोधक असलेल्या बहिण-भावाचा स्नेह पुन्हा दिसून आला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे. तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करुन घे. स्वतःची आणि घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे. 

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीचे भाजपाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात पंकजा मुंडे आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला आणि ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. खबरदारी म्हणून त्यांनी होम आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला. पंकजा मुंडे या आजारी असल्याचे समजल्यानंतर धनंजय मुडे यांनी फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. पंकजा मुंडे यांनी कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करुन घ्याव्यात, स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी आणि लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोनवरुन दिला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कायम विरोधक; संवेदनशील मनाचे दर्शन 
बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे असे नाव समोर आले की, एकमेकांचे कट्टर विरोधक अशी प्रतीमा राज्याच्या राजकारणात दिसते. मात्र, नुकत्याच झालेल्या ऊसतोड कामगारांच्या बैठकीदरम्यान ते एकत्र आले होते. त्यात पदवीधर निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान पुन्हा त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. त्यात प्रचाराच्या दरम्यान पंकजा मुंडे यांना सर्दी, ताप झाल्याने त्यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले. या घटनेनंतर धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना फोन करुन काळजी घेण्याच्या सुचना देऊन दिलासा दिला आहे. मोठा भाऊ म्हणून मी तुझ्या सोबत असल्याचे त्यांनी सांगीतले. त्यामुळे बहिण नात्यातील संवेदनशील मनाचे दर्शन झाले आहे.   
 देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image