
उत्तर भारतातील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता.तीन) जालना येथील महात्मा गांधी पुतळा परिसर येथे जागरण, गोंधळ, कीर्तन करत जागर आंदोलन केले.
जालना : उत्तर भारतातील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता.तीन) जालना येथील महात्मा गांधी पुतळा परिसर येथे जागरण, गोंधळ, कीर्तन करत जागर आंदोलन केले. यावेळी केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न मांडले. केंद्र शासनाने मंजूर केलेले कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी उत्तर भारतात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देत कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी गुरूवारी रात्री जालना शहरातील गांधी चमन येथे स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या आगळे वेगळे जागर आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी शाहीर अप्पासाहेब उगले यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थिती पोवाड्यातून मांडली. तर शिवाजी महाराज भोसले यांनी ही कीर्तनातून शेतकरी प्रश्न मंडले.
दरम्यान यावेळी गांधी चमन परिसर संबळ, ढोलकी अन् टाळाच्या आवाजाने दुमदुमून निघाले. यावेळी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा, अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे व पदाधिकारी उपस्थित होते.
संपादन - गणेश पिटेकर