वीस वर्षांनंतर होणार जळकोटला न्यायालय

शिवशंकर काळे
Wednesday, 23 December 2020

जळकोट तालुक्याची निर्मिती होऊन वीस वर्ष लोटली गेली प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी तथा दिवाणी न्यायधिश कनिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना झाली नाही.

जळकोट (जि.लातूर) : तालुक्याची मान्यता मिळून वीस वर्ष लोटले तरीही अद्याप येथे प्रथम वर्ग न्यायालयाची स्थापना झाली नसल्याने राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिष्टमंडळासोबत भेट घेऊन वरील मागणी केली असता तात्काळ मंजूर करण्याचे आदेश मंगळवारी  संबधित विभागाला दिले आहेत.

जळकोट तालुक्याची निर्मिती होऊन वीस वर्ष लोटली गेली प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी तथा दिवाणी न्यायधिश कनिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना झाली नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना न्यायालयीन कामासाठी अन्य तालुका मुख्यालयाला जावे लागत सल्याने जनतेची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे जळकोट तालुक्याच्या जनतेची न्यायालयाची मागणी होत होती.

पंकजा मुंडेंच्या ताब्यातील साखर कारखान्यात 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्यांची चोरी

राज्यमंञी संजय बनसोडे यांनी जळकोटच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन मागणी केली असता मुख्यमंत्री यांनी संबधित विभागाला आदेश देऊन न्यायालय स्थापनेसाठी आदेश दिले आहेत.

राज्यमंञी संजय बनसोडे, राष्टवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे, काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष मन्मथ किडे, किना गबाळे आदि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

औरंगाबादच्या सिडको चौकात भीषण अपघात; एक तरुण ठार, बसमधील दहा प्रवासी जखमी

न्यायालय नसल्यामुळे जळकोट तालुक्यातील नागरिकांना बाहेरील तालुक्याला कामासाठी जावे लागते.हि गोष्ट लक्षात घेऊन राज्यमंञी संजय बनसोडे यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन न्यायालयाच्या कामाला गती दिल्यामुळे वीस वर्षाच्या जनतेच्या मागणीला न्याय मिळाला आहे.
- संतोष तिडके  जिल्हा परिषद गटनेते, लातूर

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalkot sanjay bansode court Delegation Uddhav Thackeray