शुक्रवारी दोन जणांचा जीव घेणाऱ्या जालन्याच्या 'त्या' विहिरीत दुसरी कार कोसळली, पहाटे घडली दुर्दैवी घटना

उमेश वाघमारे
Sunday, 14 February 2021

जालना-देऊळगाव राजा मार्गालगत जामवाडी श्रीकृष्णनगर परिसरातील एक विहीर आहे. मार्गालगत असलेल्या या विहिरीचा वाहन चालकांना अंदाज येत नाही.

जालना : जालना-देऊळगाव राजा मार्गालगत असलेल्या जामवाडी श्रीकृष्णनगर परिसरातील विहिरीत पुन्हा एक चारचाकी कार कोसळली आहे. मागील दोन दिवसांपूर्वीच या विहिरीत भरधाव चारचाकी गाडी पडल्याने बीड येथील दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर याच  एका विहिरीत पडून रविवारी ( ता.१४ ) पहाटे कार कोसळली. या अपघातात दोन जण दगवल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जालना-देऊळगाव राजा मार्गालगत जामवाडी श्रीकृष्णनगर परिसरातील एक विहीर आहे. मार्गालगत असलेल्या या विहिरीचा वाहन चालकांना अंदाज येत नाही. परिणामी मागील दोन दिवसांत दोन कार या विहीर पडल्या आहेत. शुक्रवारी ( ता.१३) रात्री या विहिरीत कार पडल्याने बीड शहरतील दोन जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना रविवारी (ता.१४) पहाटे पुन्हा एक कार या विहिरीत कोसळली आहे. या कारमध्ये चार ते पाच जण असण्याची शकता वर्तविली जात आहे.

कार विहीरीत पडल्यानंतर दोन जणांना ग्रामस्थांनी बाहेर काढले आहे. त्यांना ग्रामस्थांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान अजून एक महिला व मुगली विहिरी असल्याची शक्यता असून पोलिस, ग्रामस्थांनी कार विहिरीच्या बाहेर काढली आहे. दरम्यान कारमधील कुटुंबिये औरंगाबाद येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान जखमी व मयत याची अद्यपी ओळख पटली नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna Accident News Car Fallen Into Well, Two Died