esakal | क्या बात है ! १०७ वर्षीय आजीने हरविले कोरोनाला, वाचा कुठं घडल हे !
sakal

बोलून बातमी शोधा

जालना.jpg

कोरानावर मात करणाऱ्या या आजीचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधिक्षक चैतन्य एस यांनी प्रत्यक्ष भेट घेवून संपुर्ण परिवाराचे अभिनंदन केले.

क्या बात है ! १०७ वर्षीय आजीने हरविले कोरोनाला, वाचा कुठं घडल हे !

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : कोरोना झाला म्हटले की आता काही खरं नाही असे समजले जाते. त्यात पन्नाशी पार केलेल्या रुग्णाला जर अन्य व्याधी असेल आणखी अवघडच आहे. मात्र, जालना शहरातील माळीपुरा येथील १०७ वर्षीय आजीबाईने कोरोनावर मात केली आहे. या आजीबाईला गुरुवारी (ता.२०) कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

जालना शहरातील माळीपुरा येथील १०७ वर्षीय वृध्द महिलेची ७८ वर्षीय मुलगी, ६५ वर्षीय मुलगा, २७ वर्षाची नात व १७ वर्षीय पणतु यांचा कोरोना चाचणी अहवाल (ता.११) ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना जालना कोविड रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस यांनी केलेल्या अथक परिश्रमातून १०७ वर्षीय वयोवृध्द आजीसह त्यांच्या कुटुंबातील मुलगी, मुलगा, नात व पणतु हे कोरोनामुक्त झाले आहे. कोरानावर मात करणाऱ्या या आजीचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधिक्षक चैतन्य एस यांनी प्रत्यक्ष भेट घेवून संपुर्ण परिवाराचे अभिनंदन केले.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे म्हणाले की, कोरोनाचे योग्य निदान व उपचाराच्या जोरावर कोरोनावर मात करणे शक्‍य आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शहरातील रहिवासी असलेल्या १०७ वर्षीय आजी आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नातून जालना शहरातील आजी कोरोनातून पूर्ण बऱ्या झाल्या असून नागरिकांनी कोरोनाबद्दल मनात कुठलीही भीती न बाळगता उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी  केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. संजय जगताप, डॉ. आशिष राठोड, डॉ. प्रताप घोडके, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय आदींची उपस्थिती होती.

(संपादन-प्रताप अवचार)
 

loading image
go to top